लंडन, 23 नोव्हेंबर : जादूचे खेळ करणं काही मोठी गोष्ट नाही, मात्र तुम्ही कधी पाण्यात राहून कोणी जादू केल्याचे पाहिले आहे? नसेल तर या व्यक्तीचे व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही हैराण व्हाल. ब्रिटनमधील एक प्रसिद्ध जादूराग चक्क पाण्यात राहून जादूचे प्रयोग करतो. यासाठी त्याच्या नावावर एका रेकॉर्डचीही नोंद झाली आहे. या जादूगाराचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
गिनीज बुकनं या जादूगाराचा एक व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट केला आहे. या जादूगाराचे नाव मार्टिन रीस असून, त्यानं आतापर्यंत लाखो मॅजिक ट्रिक्स करत लोकांचे मनोरंजन केले आहे. मात्र पहिल्यांदाच मार्टिननं पाण्याखाली राहून जादूचे प्रयोग केले.
वाचा-VIDEO: मुंबईत 'बर्निंग बस'चा थरार, चालकानं वेळीच प्रसंगावधान दाखवलं नसतं तर...वाचा-बापरे! कोंबड्या पळवणाऱ्यासाठी लावला सापळा आणि...पुढे काय झालं पाहा VIDEO
मार्टिनच्या नावावर सर्वात जास्त काळ पाण्यात राहण्याचा नाही तर कमी वेळेत जास्तीत जास्त जादूचे प्रयोग करण्याचा विक्रम नोंदवला गेला आहे. मुख्य म्हणजे मार्टिनला पाण्याची भीती वाटते, कारण लहाणपणी तो बुडता बुडता वाचला होता. मात्र ही भीती काढण्यासाठीसाठी मार्टिननं हा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला.
वाचा-गर्लफ्रेंडला भेटायला गेलेल्या प्रियकराला घरच्यांनी मारलं, सकाळी त्याला केलं जावई
मार्टिननं 2016मध्ये हवेतून स्कायडाइव्ह करत जादूचे प्रयोग केले होते. पॅराशूटनं खाली येइपर्यंत त्यानं असंख्य जादूचे प्रयोग केले होते. या मॅजिक ट्रिक्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्या आहेत. त्याचबरोबर मार्टिनच्या नावावर असंख्य रेकॉर्डची नोदं देखील झाली आहे.
Published by:Priyanka Gawde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.