Home /News /viral /

Google ने उलगडलं विवाहित महिलांच्या सर्च हिस्ट्रीचं सिक्रेट, सगळ्यात जास्त काय शोधतात?

Google ने उलगडलं विवाहित महिलांच्या सर्च हिस्ट्रीचं सिक्रेट, सगळ्यात जास्त काय शोधतात?

आजच्या काळात गुगल सर्च (Google Search) हे आपल्यासाठी अन्न, वस्त्र आणि निवारा या प्राथमिक गरजांइतकं महत्त्वाचं बनलं आहे. कारण या एकमेव सर्च इंजिनवरून आपण जगाशी संबंधित कोणत्याही गोष्टीची माहिती घेऊ शकतो.

मुंबई, 28 जून : आजच्या काळात गुगल सर्च (Google Search) हे आपल्यासाठी अन्न, वस्त्र आणि निवारा या प्राथमिक गरजांइतकं महत्त्वाचं बनलं आहे. कारण या एकमेव सर्च इंजिनवरून आपण जगाशी संबंधित कोणत्याही गोष्टीची माहिती घेऊ शकतो. पिनपासून ते प्लेन अर्थात विमानापर्यंत सर्व गोष्टींची माहिती देणारी ही कंपनी दर वर्षी एक अहवाल (Report) प्रसिद्ध करते. एका वर्षात युझर्सनी या साइटवर सर्वांत जास्त काय सर्च केलं याचा तपशील या अहवालात असतो. चित्रपटसृष्टीतल्या सेलेब्रिटीजपासून (Celebrities) ते कोणत्याही वस्तूपर्यंत सर्वांत जास्त कशाविषयी सर्च केलं गेलं आणि ते कोणत्या वयोगटातल्या व्यक्तींनी शोधलं, त्यांची वैवाहिक स्थिती कशी होती, याबाबतचा तपशील या अहवालात गुगलने दिला आहे. आता गुगलकडे आपली सर्व माहिती असल्याने त्याचा फायदा घेऊन हा अहवाल अधिक तपशीलवार बनवला जातो. या अहवालातला एक भाग युझर्सना आश्चर्यचकित करणारा आहे. यामध्ये गुगलने विवाहित महिलांबाबत (Married Women) एक खुलासा केला आहे. विवाहित महिला गुगलवर सर्वांत जास्त कोणत्या विषयाच्या अनुषंगानं सर्चिंग करतात, हे अहवालाच्या माध्यमातून मांडण्यात आलं आहे. पतीशी संबंधित आहे सर्वात आवडता प्रश्न विवाहित महिला गुगलवर सर्वांत जास्त काय सर्च करतात, याविषयी गुगलच्या एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. `नवभारत टाइम्स`च्या वृत्तानुसार, विवाहित महिला गुगलच्या माध्यमातून आपल्या पतीची (Husband) माहिती घेण्याचा सर्वाधिक प्रयत्न करतात, असं गुगलच्या डेटावरून दिसतं. नवऱ्याला आनंदी कसं ठेवायचं, हा सर्वांत जास्त विचारला जाणारा प्रश्न आणि विवाहित महिलांचा सर्वांत आवडता विषयदेखील आहे. आश्चर्याची बाब म्हणजे विवाहित महिलांना गुगलवरही केवळ आपल्या पतीविषयी जाणून घ्यायला आवडतं. उद्योग, व्यवसायाविषयीही सर्च करतात महिला या अहवालात पुढं नमूद करण्यात आलं आहे, की पतीला आनंदी कसं ठेवायचं या प्रश्नाशिवाय महिला इतरही अनेक प्रश्न सर्च करतात. अनेक विवाहित महिलांकडून पतीला आपल्या ताब्यात कसं ठेवायचं आणि सासरकडच्या मंडळींशी कसं वागायचं याबाबतसुद्धा सर्च केलं गेलं आहे. याशिवाय पतीसोबत चांगले संबंध कसे ठेवता येतील याबाबतही विवाहित महिला गुगलवर शोध घेतात. महिला आता स्वावलंबी होत आहेत. अशा परिस्थितीत त्या गुगलवर उद्योग, व्यवसायाच्या (Business) विविध पद्धतींचा शोध घेतात. स्वतःचा व्यवसाय कसा सुरू करता येईल, असा प्रश्न अनेक महिलांकडून विचारला जात आहे. विवाहानंतर मूल जन्माला घालण्यासाठी योग्य वेळ कोणती या प्रश्नाबाबतही अनेक महिलांनी गुगलवर सर्चिंग केल्याचं आढळलं आहे.
First published:

Tags: Google

पुढील बातम्या