Home /News /viral /

घरच्यांनी वेगळं केलं पण अखेर ते एकत्र आलेच, विवाहितेनं ट्रेनमधील टॉयलेटसमोर प्रियकरासोबत बांधली लग्नगाठ

घरच्यांनी वेगळं केलं पण अखेर ते एकत्र आलेच, विवाहितेनं ट्रेनमधील टॉयलेटसमोर प्रियकरासोबत बांधली लग्नगाठ

एका विवाहित महिलेनं ट्रेनमध्ये तेही स्वच्छतागृहाच्या समोर आपल्या प्रियकरासोबत लग्नगाठ (Marriage in Train) बांधली आहे. , दोन महिन्यांपूर्वीच या महिलेचा विवाह किरणपुर गावातील एका तरुणासोबत झाला होता.

    पाटणा 13 जून: लग्न म्हटलं की दारात मंडप, पाहुणे मंडळी आणि वाजत-गाजत वरात, असं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभा राहातं. मात्र, सध्या एक लग्न चर्चेचा विषय ठरत आहे. यात एका विवाहित महिलेनं ट्रेनमध्ये तेही स्वच्छतागृहाच्या समोर आपल्या प्रियकरासोबत लग्नगाठ (Marriage in Train) बांधली आहे. यानंतर महिलेनं आपल्या पहिल्या पतीसोबतचं नातं तोडलं. मिळालेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वीच या महिलेचा विवाह किरणपुर गावातील एका तरुणासोबत झाला होता. यानंतर एक दिवस तरुणी फरार होऊन आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी गेली. ही घटना बिहारच्या सुल्तानगंजमधील भीरखुर्दच्या उधाडीह गावातील आहे. हेही वाचा - अल्पवयीन मुलीनं मित्राच्या मदतीनं लांबवलं 16 तोळे सोनं; फिल्मी स्टाईलनं अटक ही महिला आपल्या प्रियकराला ट्रेनमध्ये भेटली. यानंतर प्रियकर आशु कुमार यानं चालत्या ट्रेनमध्ये टॉयलेटसमोरच विवाहित महिलेच्या भांगात कुंकू भरलं आणि तिच्यासोबत लग्नगाठ बांधली. या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायर होत आहेत. लग्नानंतर आशु कुमार यानं सांगितलं, की तो गेल्या अनेक वर्षांपासून गावातीलच अनु कुमारी हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होता. हेही वाचा - जगातील सर्वात लांब पापण्या असलेल्या महिलेचा फोटो व्हायरल, घालावी लागते वेणी तरुणानं सांगितलं, की मुलीच्या घरच्यांना त्यांच्या रिलेशनबाबत माहिती झाल्यावर तिच्या घरातून बाहेर पडण्यावरही बंदी घालण्यात आली. याच दरम्याम मुलीच्या घरच्यांनी एप्रिल महिन्यात जबरदस्ती या तरुणीचा विवाह किरणपुर गावातील एका युवकासोबत लावून दिला. युवकानं दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर तिनं आपल्या पतीसोबत राहाण्यास नकार दिला. बुधवारी संधी मिळताच ही तरुणी आपल्या प्रियकरासोबत फरार झाली. दोघंही सुल्तानगंज स्टेशनवर पोहोचून बंगळुरुसाठी रवाना झाले आणि याच दरम्यान त्यांनी ट्रेनमध्येच लग्नगाठ बांधली.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Marriage, Train, Wedding

    पुढील बातम्या