नवी दिल्ली 01 एप्रिल : पतीचं निधन हा कोणत्याही पत्नीसाठी अतिशय मोठा धक्का असतो. ज्या नवऱ्यासोबत आयुष्य घालवायचं वचन दिलेलं असतं तोच तिला एकटं सोडतो तेव्हा बहुतेक महिला आतून तुटतात. कालांतराने त्यांना पुन्हा एकटं जीवन जगण्याची सवय करावी लागते. पण सुरुवातीच्या दिवसांचा एकटेपणा खूप कठीण असतो. अपघातात पती गमावणं ही एक वेगळी गोष्ट आहे. पण जर एखाद्या पतीने स्वतःच्या मृत्यूचं खोटं नाटक केलं आणि स्वतःच्या पत्नीला विधवेचं जीवन जगण्यास भाग पाडलं तर?
ना बोलते, ना संवाद करते, चेहराही आहे भयानक; याची प्रेयसी पाहून तुम्ही घाबरुन जाल
सोशल मीडियावर एका महिलेनं तिच्या पतीच्या अशाच एका कृत्याचा खुलासा केला आहे. महिलेचा दावा आहे की तिच्या पतीने केवळ आपल्या प्रेयसीसोबत राहण्यासाठी आत्महत्या करण्याचं नाटक केलं. महिलेलाही वाटलं की तिच्या पतीचं निधन झालं आहे. ती त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी करू लागली. पण नंतर तिला कळलं की तिचा नवरा त्याच्या प्रेयसीसोबत मेक्सिकोमध्ये आरामदायी जीवन जगत आहे.
हे संपूर्ण प्रकरण कॅलिफोर्नियातील सॅन डिएगो येथील आहे. तिथे राहणाऱ्या अनेसा रॉसीने टीमसोबत लग्न केलं. दोघांमध्ये काही गोष्टीवरून मतभेद झाले, त्यानंतर दोघं पाच महिने वेगळे राहात होते. दरम्यान, पतीने गळफास लावून आत्महत्या केल्याचं अनेसा यांना समजलं. पतीच्या निधनाची बातमी ऐकून अनेसा यांना खूप वाईट वाटलं आणि त्यांना स्वतःचाच राग येऊ लागला. पती गेल्याने ती शोक करत होती. अंत्यसंस्कार करण्याचीही ती तयारी करत होती. पण त्याच दरम्यान असं एक सत्य समोर आलं की तिला धक्काच बसला.
या घटनेनंतर महिलेला एक असं सत्य समजलं, जे जाणून तिच्या पायाखालची जमीन सरकली. अनेसाच्या म्हणण्यानुसार, तिचा नवरा त्याच्या 6 वर्षांपासूनच्या प्रेयसीसोबत मेक्सिकोमध्ये इतके दिवस राहत होता. अनेसाने तिच्यासोबत घडलेली ही घटना सोशल मीडियावर शेअर केली आहे. दोघांचा घटस्फोट झालेला नसल्यामुळे कायदेशीरदृष्ट्या केवळ अनेसाच टीमची पत्नी मानली जाईल. त्याचवेळी ही घटना समोर आल्यानंतर टीमनेही अनेसाच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली.
टीमने सांगितलं की, त्याने कधीही त्याच्या मृत्यूची अफवा पसरवली नाही. त्याने सांगितलं की अनेसा त्याला घटस्फोट देत नव्हती. तसंच, दोघांमध्ये जोरदार भांडणं व्हायची, त्यामुळे तो अनेसापासून दूर राहत होता. अनेसा या व्हिडिओमध्ये जे काही बोलली ते खोटं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral news, Wife and husband