मराठी बातम्या /बातम्या /Viral /Marriage Certificate बनवणं का असतं महत्वाचं? याचे फायदे माहितीय का?

Marriage Certificate बनवणं का असतं महत्वाचं? याचे फायदे माहितीय का?

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

तुम्ही आधी लग्न केलं असलं तरी देखील कोर्टात तुम्हाला त्याचा पुरावा दाखवून सर्टिफिकेट घ्यावच लागतं. हे सर्टिफिकेट का लागतं आणि ते का महत्वाचं आहे तुम्हाला माहितीय?

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई : लग्न हा प्रत्येक तरुण आणि तरुणीच्या आयुष्याती महत्वाचा क्षण असतो. लग्न म्हणजे फक्त दोन हृदयांचं मिलन नसून ते दोन कुटुंबासाठी देखील फार महत्वाचं आहे. म्हणूनच तर लग्नाआधी कुटुंबाबद्दल देखील जाऊन घेतलं जातं. यासगळ्यानंतर लग्न झाल्यानंतर एक महत्वाची गोष्टी जोडप्याला करावी लागते, ते म्हणजे लग्नाचा पुरावा. त्याची लग्न रजिस्टर करावं लागतो असा नियम आहे.

  तुम्ही आधी लग्न केलं असलं तरी देखील कोर्टात तुम्हाला त्याचा पुरावा दाखवून सर्टिफिकेट घ्यावच लागतं. हे सर्टिफिकेट का लागतं आणि ते का महत्वाचं आहे तुम्हाला माहितीय?

  Court Marriage and Marriage Registration : कोर्ट मॅरेज आणि रजिस्टर मॅरेज दोघांमध्ये फरक काय?

  विवाह प्रमाणपत्र आवश्यक का आहे?

  विवाह प्रमाणपत्रामुळे विवाहाच्या बंधनात बांधलेल्या लोकांना सामाजिक ओळख मिळते. तसेच, ते नवरा-बायकोच्या अधिकारांचे रक्षण करते. याचे इतर काही फायदेही आहेत.

  जसे की जॉइंट अकाउंट, पासपोर्ट आणि कपल ट्रॅव्हल व्हिसा बनवण्यासाठी मॅरेज सर्टिफिकेट खूप उपयुक्त आहे. जर एखाद्या महिलेला लग्नानंतर तिचे नाव बदलायचे असेल तर त्यासाठीही तिला आधी तिचे लग्नाचे प्रमाणपत्र दाखवावे लागेल.

  पण महिलेने लग्नानंतर नाव जरी बदलायचे नसले तरी देखील हे प्रमाणपत्र प्रुफ आहे की त्या महिलेचं लग्न झालेलं आहे, ज्यामुळे ती इतर सरकारने दिलेल्या सेवा आणि नियमांचा लाभ घेऊ शकते.

  लग्नानंतर जोडीदाराने फसवणूक करून फरार झाल्यास पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठीही विवाह प्रमाणपत्र उपयुक्त ठरते. घटस्फोटानंतर जर महिलेला जगण्यासाठी आर्थिक पाठबळ, ज्याला आपण पोटगी देखील म्हणतो, ते हवे असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमचे लग्नाचे प्रमाणपत्र न्यायालयात दाखवावे लागेल.

  लग्नाचा प्रमाणपत्र कसा बनवायचा?

  विवाह प्रमाणपत्रासाठी तुम्ही घरबसल्या ऑनलाइन अर्ज करू शकता. यासाठी राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करा. या पोर्टलवर, तुम्हाला वधू-वरांचा पासपोर्ट आकाराचा फोटो, लग्नाचा फोटो, मोबाईल नंबर, दोघांचा ओळखपत्र (मतदार I कार्ड किंवा आधार कार्ड), जन्मतारीख (जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड, 10वी गुणपत्रिका,) द्यावा लागेल. वधू-वरांचे प्रतिज्ञापत्र आणि दोन साक्षीदारांचे ओळखपत्र द्यावे लागेल.

  विवाह प्रमाणपत्र तयार झाल्यानंतर, तुम्हाला नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर अपडेट मिळेल की, तुमचे प्रमाणपत्र तयार आहे. यानंतर तुम्ही वेबसाइटवर जाऊन ते डाउनलोड करू शकता.

  First published:
  top videos

   Tags: Lifestyle, Marriage, Wedding, Wife and husband