मराठी बातम्या /बातम्या /Viral /

अजबच! मोफत जेवण मिळवण्यासाठी शेकडो लोकांनी बदलली आपली नावं; आता होतोय पश्चाताप

अजबच! मोफत जेवण मिळवण्यासाठी शेकडो लोकांनी बदलली आपली नावं; आता होतोय पश्चाताप

सुशिरो या प्रसिद्ध रेस्टॉरंट चेनने लोकांना ऑफर दिली होती की, जर त्यांना मोफत जेवण हवं असेल किंवा त्यात मोठी सूट हवी असेल तर त्यांना कायदेशीररित्या आपलं नाव बदलून सॅल्मनशी मिळतं-जुळतं ठेवावं लागेल.

  • Published by:  Kiran Pharate
नवी दिल्ली 31 मे : तैवानमध्ये एक खास डिश आहे - सुशी. ही डिश लोकांना इतकी आवडते, की त्यासाठी ते काहीही करू शकतात. होय, इथे जर कोणी लोकांना मोफत सुशी खायला देण्याऐवजी त्यांचं नाव बदलण्यास सांगितलं, तर लोक तेही करतात. आम्ही आज हे सांगत आहोत कारण तैवानमध्ये मोफत अन्न मिळवण्यासाठी शेकडो लोकांनी कायदेशीररित्या आपली नावं बदलली आहेत (People Changed Names for Free Food). VIDEO: व्यक्तीने कॅमेऱ्यासमोर खाल्ल्या जगातील सर्वात तिखट मिरच्या; अवस्था पाहूनच अंगावर येईल काटा ही विचित्र घटना मार्च 2021 मध्ये तैवानमध्ये घडली होती, जी जगभरात चर्चेत होती. येथील सुशिरो या प्रसिद्ध रेस्टॉरंट चेनने लोकांना ऑफर दिली होती की, जर त्यांना मोफत जेवण हवं असेल किंवा त्यात मोठी सूट हवी असेल तर त्यांना कायदेशीररित्या आपलं नाव बदलून सॅल्मनशी मिळतं-जुळतं ठेवावं लागेल. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे लोकांनी यासाठी आपली नावंही बदलली. Salmon ची ही गोष्ट इतर देशांमध्येही खूप गाजली. लोकप्रिय सुशी रेस्टॉरंट चेन सुशिरोने ऑफर केली की ज्यांच्या नावामध्ये Salmon असेल त्यांना कमी किमतीत किंवा मोफत सुशी खायला मिळेल. त्याच्यासोबत आणखी 5 लोक मोफत जेवण घेऊ शकत होते. लोकांनी या ऑफरचा फायदा घेतला आणि Household Registration Offices ने सांगितल्यानंतरही सुमारे 330 लोकांनी कायदेशीररित्या आपली नावं बदलली. रेस्टॉरंटची जाहिरात इतकी लोकप्रिय झाली की यामुळे तैवानच्या राजकारणातही पेच निर्माण झाला. PHOTO - डिस्काऊंटच्या नादात दातांवर उपचारासाठी परदेशात गेली; तोंड उघडताच हादरली महिला त्या काळी फुकटच्या जेवणाच्या ऑफरसाठी लोकांनी Salmon वरुन स्वतःला अजब नावं दिलं. काही लोकांची नावं कायदेशीररित्या बदलली गेली, परंतु काही लोक त्याच विचित्र नावात अडकले आहेत. तैवानच्या कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीला तीन वेळा नाव बदलण्याचा अधिकार आहे. ज्यांनी पहिल्यांदाच आपलं नाव बदललं होतं, त्यांनी पुन्हा आपलं जुनं नाव परत ठेवलं, परंतु काही लोकांना हे माहिती नव्हतं की त्यांचं नाव लहानपणीच दोनदा बदललं गेलं आहे आणि आता ते पुन्हा नाव बदलू शकत नाहीत. आजही ते डान्सिंग सॅल्मन, लाफिंग सॅल्मन अशी नावं घेऊन फिरतायेत.
First published:

Tags: Food, Viral news

पुढील बातम्या