नवी दिल्ली 26 ऑक्टोबर : भारतात सध्या थंडीचा काळ सुरू आहे तर ऑस्ट्रेलियात वसंत ऋतू सुरू आहे. यादरम्यान तिथे भयंकर पाऊस होणं, ही सामान्य बाब आहे. मात्र, नुकतंच ऑस्ट्रेलियामध्ये असं काही घडलं जे पाहून सगळेच हैराण झाले. इथे काही दिवसांपूर्वीच आलेल्या भयंकर वादळी वाऱ्यामुळे मुसळधार पाऊस झाला (Heavy Hailstorm). पाऊस सुरू असतानाच अचानक आकाशातून दगड कोसळू लागले. यात रस्त्यावर उभा गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.
Shocking! आधी रस्त्यावर एकत्र आल्या 50 एअर होस्टेस; मग काढू लागल्या कपडे अन्...
19-20 ऑक्टोबरच्या दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड येथे भयंकर पाऊस झाला (Large Hail pelted in Australia) . हा पाऊस लोकांसाठी अनेक अडचणी घेऊन आला. कारण पावसासोबतच गाराही कोसळू लागल्या. या गारांचा आकार इतका मोठा होता की ते एखाद्या संत्र्याएवढे दगड असल्याप्रमाणे दिसत होते. मिळालेल्या माहितीनुसार, यातील काही गारांची लांबी ६ इंच होती. सध्या याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून याची एकच चर्चा रंगली आहे.
Spring in Australia... 🌨️ A large-scale multi-agency response is continuing in Coffs Harbour right now after a freak hail storm hit just before 3pm. 280+ calls for help so far and more expected as residents return home. Extensive damage reported across city @nbnnews @9NewsSyd pic.twitter.com/kPtfpBijQH
— Olivia Grace-Curran (@livgracecurran) October 20, 2021
हा पाऊस अतिशय भयंकर होता. असा दावा केला जात आहे, की इतक्या जास्त प्रमाणात देशात पहिल्यांदाच गारांचा पाऊस झाला आहे. ऑस्ट्रेलियन ब्यूरो ऑफ मेटिओरॉलोजीच्या शेन केनेडी यांचं असं म्हणणं आहे, की सहा इंचापेक्षा मोठ्या गारा १०० किमी प्रति तासाच्या वेगाने कोसळत होत्या. अनेक ठिकाणी यामुळे गाड्यांचं भरपूर नुकसान झाल्याचंही समोर आलं. एवढ्या वेगात मोठमोठ्या गारा गाड्यांवर कोसळल्यानं अनेक गाड्यांचा अक्षरशः चुराडा झाला.
'इथे येताना स्कर्ट घालू नका'; महिला पर्यटकांना दिला जातोय अजब सल्ला, वाचा कारण
रिप्लीज वेबसाईटच्या वृत्तानुसार, स्टेट एमर्जंसी डिपार्टमेंटला 280 हून अधिक कॉल मागील बुधवारी आले. यात अनेकांनी बर्फवृष्टीमुळे रस्त्यात अडकल्याचं सांगत मदत मागितली. सोशल मीडियावरही अनेकांनी गारांचा आणि गाड्यांच्या झालेल्या नुकसानाचा फोटो शेअर केला. केनेडीच्या म्हणण्यानुसार, य़ाआधी ५.५ इंचाच्या गारा ऑस्ट्रेलियात रेकॉर्ड केल्या गेलेल्या. मात्र, यावेळी पहिल्यांदाच गारांचा आकार 6.3 इंच आढळला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.