Home /News /viral /

अस्वलाने तरुणाच्या चेहऱ्याचे अक्षरशः लचके तोडले, डॉक्टरांनी 4 तासाच्या सर्जरीत 300 टाके घालत घडवला चमत्कार

अस्वलाने तरुणाच्या चेहऱ्याचे अक्षरशः लचके तोडले, डॉक्टरांनी 4 तासाच्या सर्जरीत 300 टाके घालत घडवला चमत्कार

26 वर्षीय धर्मेश राठवा हा 1 जानेवारी रोजी गावातील शेतात शौचासाठी गेला असता त्याच्यावर अस्वलाने हल्ला केल्याने चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या (Man Injured in Bear Attack).

  वडोदरा 06 जानेवारी : अस्वलाच्या हल्ल्यात पूर्णपणे विद्रूप झालेला माणसाचा चेहरा सरकारी एसएसजी रुग्णालयातील प्लास्टिक सर्जनांनी यशस्वीपणे पुन्हा व्यवस्थित केला. बाहेर अतिशय खर्चिक ठरणारी ही शस्त्रक्रिया सरकारी रुग्णालयात मोफत करण्यात आली (Critical Surgery with 300 Stitches). छोटा उदेपूर येथील पाविजेतपूर तालुक्यातील अंबापूर गावात राहणारा 26 वर्षीय धर्मेश राठवा हा 1 जानेवारी रोजी गावातील शेतात शौचासाठी गेला असता त्याच्यावर अस्वलाने हल्ला केल्याने चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या (Man Injured in Bear Attack).

  खेळता खेळता 3 वर्षांच्या बाळाच्या डोळ्यात घुसली कात्री; वेदनेने विव्हळत राहिला

  नाक, हाडे, स्नायू, ओठ, खालच्या पापण्या आणि अगदी गालांसह त्याच्या चेहऱ्याचा जवळपास प्रत्येक भाग गंभीर जखमी झाला होता (Man's Face Disfigured in Bear Attack). जखमी राठवाला वडोदरा येथील एसएसजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. खरंतर, त्याच्या चेहऱ्याचा एक तृतीयांश भाग पूर्णपणे खराब झाला होता. प्लास्टिक सर्जरी विभागाचे प्रमुख आणि SSG हॉस्पिटलचे सहयोगी प्राध्यापक डॉ शैलेश कुमार सोनी म्हणाले, की “जेव्हा त्याला आमच्याकडे आणण्यात आलं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर बिया, धूळ, पानं आणि दगडही रोवले गेले होते. सुरुवातीला आम्हाला त्याला रेबीज, टिटॅनस आणि अँटीबायोटिक शॉट्स द्यावे लागले, चेहऱ्याची पुनर्रचना करण्यासाठी ऑपरेशन करण्यापूर्वी सीटी-स्कॅन करावं लागलं” . डॉ. सोनी यांनी डॉ. भाग्यश्री देशमाणकर, डॉ. नलिन प्रजापती, डॉ. सुदर्शन यादव आणि डॉ. रिद्धी सोमपुरा यांच्यासह तब्बल चार तास या व्यक्तीची शस्त्रक्रिया केली. या व्यक्तीचं नाकही श्वसनमार्गापासून पूर्णपणे वेगळं झालेलं होतं. चार तास चाललेल्या या सर्जरीत व्यक्तीच्या चेहऱ्यावर 300 टाके टाकण्यात आले. या व्यक्तीच्या नाकाची रचना पूर्णपणे खराब झालेली असल्याने डॉक्टर कविता लालचंदानी, डॉ. नेहा शाह आणि डॉ. रिमा गोमेटी यांचा समावेश असलेल्या भूलतज्ज्ञांच्या टीमला संपूर्ण आव्हानात्मक शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाला बेशुद्ध ठेवण्यासाठी थांबावे लागले.

  Coronavirus Update: 7 दिवस घरात आणि 3 दिवस ताप नको, नव्या Guidelines जारी

  “आम्ही चिरडलेल्या त्वचेचा काही भाग व्यवस्थित मिळवला. उर्वरित चेहऱ्याच्या पुनर्रचनेसाठी टायटॅनियम प्लेट्स आणि जाळी वापरली. हाडांचे सर्व भाग एकत्र करणं हे एक कोडं होतं,” असं डॉ सोनी यांनी TOI ला सांगितलं.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Attack, Surgery

  पुढील बातम्या