Home /News /viral /

झोपेत पाहिलेलं स्वप्न जेव्हा सत्यात उतरतं; 2 दिवासत युवकानं जिंकले 55 लाख रुपये, नेमकं काय घडलं?

झोपेत पाहिलेलं स्वप्न जेव्हा सत्यात उतरतं; 2 दिवासत युवकानं जिंकले 55 लाख रुपये, नेमकं काय घडलं?

अमेरिकेच्या कांसासमध्ये राहाणारा मेसन क्रेंट्ज (Mason Krentz) हा व्यक्ती कधी कधी लॉटरीचं तिकीट विकत घेतो. काही दिवसांपूर्वी त्यानं स्वप्नात पाहिलं, की त्यानं लॉटरीमध्ये 25000 डॉलर म्हणजेच जवळपास 18 लाख 54 हजार 562 रुपये जिंकले आहेत

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली 25 जून: असं म्हटलं जातं, की स्वप्नं (Dream) नेहमी उघड्या डोळ्यांनी पाहावी. जेणेकरून ती स्वप्नं आपल्याला सत्यात उतरवता येतील. मात्र, अमेरिकेच्या (America) कांसासमध्ये (Kansas) राहाणाऱ्या एका व्यक्तीनं झोपेत एक स्वप्न पाहिलं आणि विशेष म्हणजे हे स्वप्न खरंही झालं. या व्यक्तीनं स्वप्नात लॉटरीचं तिकीट (Lottery Ticket) जिंकलं होतं. यूपीआयच्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या कांसासमध्ये राहाणारा मेसन क्रेंट्ज (Mason Krentz) हा व्यक्ती कधी कधी लॉटरीचं तिकीट विकत घेतो. काही दिवसांपूर्वी त्यानं स्वप्नात पाहिलं, की त्यानं लॉटरीमध्ये 25000 डॉलर म्हणजेच जवळपास 18 लाख 54 हजार 562 रुपये जिंकले आहेत. स्वप्न पाहिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यानं लॉटरीचं तिकीट विकत घेतलं. स्वप्न पाहिल्यामुळे आपल्याला यातून थोडे का होईना, पण पैसे मिळतील, अशी त्याला खात्री होती.. केंद्रीय Pensioners च्या खात्यात किती पैसे आले? आता WhatsApp वर मिळेल माहिती मेसननं दुसऱ्याच दिवशी लॉटरीचं तिकीट खरेदी केलं. त्यांनी कांसास येथील लॉटरी अधिकाऱ्यांना आपल्या स्वप्नाबाबत आणि आशेबाबत सांगितलं. त्यांना जिंकण्याची आशा यामुळेही होती, कारण याआधीही त्यांनी अनेकदा लॉटरीमध्ये रक्कम जिंकली आहे. मात्र, त्यावेळी त्यांना आश्चर्याचा धक्का बसला, जेव्हा तो 18 लाखाच्या जागी 75 हजार डॉलर म्हणजेच 55,63,668.75 रुपये जिंकला. त्यानं आपल्या स्वप्नापेक्षा तिप्पट रक्कम जिंकली होती. अंडरवर्ल्ड दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर अटक संदर्भातली मोठी अपडेट मेसन क्रेंट्ज यानं सांगितलं, की या रकमेतून ते आपल्या पत्नीसाठी नवी गाडी विकत घेणार आहेत. तसंच सिल्व्हर लेकमध्ये जमीनही घेणार आहेत. यानंतर उरलेले पैसे ते म्युचुअल फन्ड्समध्ये गुंतवणार (Mutual Funds Investment) आहेत. या पैशांतून नंतर ते घर बांधणार आहे. आपलं स्वप्न सत्यात उतरलं आहे, यावर त्यांना अजूनही विश्वास बसन नसल्याचं, त्यांनी म्हटलं.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Lottery, Money

    पुढील बातम्या