जोधपूर, 29 जानेवारी : सध्या पठाण फिल्ममुळे अभिनेता शाहरूख खान चांगलाच चर्चेत आहे. अशात एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. ज्यात मन्नतमध्ये एका तरुणीने फुल्ल राडा केला आहे. ड्रेस फिट न झाल्याने तरुणीने चक्क शाहरूखला मारहाण केली आहे. मन्नतमधून बाहेर आणत त्याला रस्त्यावर चोप चोप चोपलं आहे. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. वाचूनच तुम्हालाही धक्का बसेल नाही का? नेमकं हे प्रकरण काय आहे पाहुयात.
राजस्थानच्या जोधपूरमधील हे प्रकरण आहे. जोधपूर जिल्ह्यातील सरदारपुरा परिसरात 26 जानेवारीला घडलेली ही घटना. इथल्या मन्नत सिलेक्शन या कपड्यांच्या दुकानातून एका तरुणीने ड्रेस विकत घेतला होता. तो ड्रेस तिने घालून पाहिला तर तिला फिट होत नव्हता. तिने याबाबत दुकानदाराला सांगितलं. त्यानंतर तरुणी आणि दुकानदाराचा वाद झाला. मीडिया रिपोर्टनुसार शाहरूख आणि सलमान अशी या दुकानदारांची नावं आहेत.
तरुणी आणि दुकानदारांमधील वाद विकोपाला गेला. त्यानंतर तरुणीने थेट आपल्या घरी आणि ओळखीच्या लोकांना फोन करून त्यांना दुकानात बोलावून घेतलं. त्यानंतर त्यांच्यासह तरुणीने दुकानदाराराला मारहाण केली. दुकानातून बाहेर रस्त्यावर खेचत आणलं आणि लाथाबुक्क्यांनी मारलं. हा व्हिडीओही व्हायरल होतो आहे.
दरम्यान दुकानदार आणि तरुणी दोघांनीही एकमेकांविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. तरुणीने दुकानदारांवर छेडछाड आणि मारहाणीचा आरोप लावला आहे. तर दुकानदारांनी तरुणी आणि तिच्यासोबत असलेल्या तरुणांविरोधात तक्रार करत तरुणीने गल्ल्यातील पैसे घेतल्याचा आरोपही केला आहे.
हे वाचा - इवलासा उंदीर कुटुंबासाठी बनला देवदूत; एकाच वेळी 5 माणसांचा वाचवला जीव
या मारहाणीत काही जण जखमी झाल्याची माहिती. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान व्हिडीओनुसार या प्रकरणाता पोलीस अधिक तपास करत आहेत. अद्याप कुणाला अटक झालेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Rajasthan, Viral, Viral videos