लेडी स्पायडरमॅन! जीवाची बाजी लावून महिलेने विहिरीतून श्वानाला वाचवलं, VIDEO VIRAL

लेडी स्पायडरमॅन! जीवाची बाजी लावून महिलेने विहिरीतून श्वानाला वाचवलं, VIDEO VIRAL

प्राणी प्रेमं पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी, मुक्या जीवाला वाचवण्यासाठी तिचा जीव धडपडत होता

  • Share this:

मंगळुर, 02 फेब्रुवारी: प्राण्यांवर अपार प्रेम पाहून आपल्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही असा एका व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाण्यानं भरलेल्या विहिरीत कुत्रा पडला होता. त्याला वाचवण्यासाठी महिलेनं चक्क आपला जीव धोक्यात घातला आणि जीवाची पर्वा न करता त्या कुत्र्याला विहिरीबाहेर सुखरुप काढलं. तिच्या या धाडसाचं कौतुक सगळ्या गावात होत आहे. महिलेनं दाखवलेलं धाडस आणि प्राण्यावरचं प्रेम अपार आहे. हा व्हिडिओ मंगळुरु इथला असल्याची चर्चा होत आहे. महिलेच्या या धाडसाचं युझर्सकडूनही कौतुक होत आहे.

Mauna नावाच्या युझरने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. 15.9 हजार युझर्सनी हा व्हिडिओ पाहिला असून दीड हजारहून अधिक लोकांनी लाईक तर 500 हून अधिक लोकांनी कमेंट्स केल्या आहेत.

धाडसी महिलेला सलाम असं युझर्सनी सोशल मीडियावर म्हटलं आहे. या महिलेचं कौतुक होत आहे. 31 जानेवारीचा हा मंगळुरू इथला व्हिडिओ असल्याची माहिती मिळत आहे. तरुणीचं असलेलं श्वान प्रेम पाहून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहात नाही. एकीकडे कोरोना वायरसच्या भीतीनं कुत्र्या मांजरांना घराबाहेर फेकून दिलं जात असतानाच दुसरीकडे श्वानाला वाचवण्यासाठी महिलेची धडपड पाहून तिच्या धौर्याला सलामच करायला हवा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 2, 2020 01:06 PM IST

ताज्या बातम्या