Home /News /viral /

दारुची दुकानं उघडताच आनंद गगनात मावेना; तळीरामानं दिवा लावून केली बाटल्यांची पुजा, Video Viral

दारुची दुकानं उघडताच आनंद गगनात मावेना; तळीरामानं दिवा लावून केली बाटल्यांची पुजा, Video Viral

सोमवारपासून नियम शिथील होताच तळीरामांसाठी ही मेजवानीच ठरली आहे. कोरोनाची रुग्णसंख्या (Corona Cases) कमी होत असल्यानं नियमांमध्ये शिथीलता आणताच दारुच्या दुकानांवर एकच गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे.

    चेन्नई 15 जून : मागील वर्षीपासूनच लॉकडाऊन (Lockdown) लागलं की सर्वाधिक तारांबळ होते ती तळीरामांची. लॉकडाऊनचे नियम शिथील होऊ लागताच या लोकांच्या जणू जीवात जीव येतो. तमिळनाडूमध्येही कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कडक नियम घालण्यात आले होते. मात्र, आता सरकारनं या नियमांमध्ये शिथिलचा आणण्यास सुरुवात केली असून दारुची दुकानं उघडण्यासही (Liquor shops open) परवानगी दिली आहे. सोमवारपासून हे नियम शिथील होताच तळीरामांसाठी ही मेजवानीच ठरली आहे. कोरोनाची रुग्णसंख्या (Corona Cases) कमी होत असल्यानं नियमांमध्ये शिथीलता आणताच दारुच्या दुकानांवर एकच गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. याच संदर्भातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Video Viral on Social Media) झाला आहे. यात पाहायला मिळतं, की एका व्यक्तीला दारुचं दुकानं उघडल्याचा इतका आनंद होतो, की तो आधी दुकानाच्या बाहेर दिवा लावतो. यानंतर काउंटरवर जाऊन दोन बाटल्या विकत घेतो आणि अग्निदेवताच्या समक्ष त्यांचं दर्शन घेतो. यानंतरच तो दारु पिण्याचा आनंद घेतो. त्याला पाहून दुसराही एक व्यक्ती तिथे पोहोचतो आणि या पुजेमध्ये त्याला साथ देतो. लग्नासाठी नाचत होती लेक, आईची सटकली आणि...; काय घडलं पाहा VIDEO हा व्हिडिओ एएनआयनं आपल्या ट्विटवर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. तमिळनाडूमध्ये कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता कडक निर्बंध लावण्यात आले होते. मात्र, 35 दिवसांनंतर 27 जिल्ह्यांमध्ये सलून, पार्क आणि दारुची दुकाने 14 जूनपासून पुन्हा एकदा सुरू झाली आहेत. राज्य सरकारनं शुक्रवारीच या शिथीलतेबाबत घोषणा केली होती. यासोबतच 21 जूनपर्यंत लॉडकडाऊन वाढवण्यात आलं होतं. धार्मिक आणि पर्यटन स्थळं बंदच राहाणार असल्याचं सरकारनं सांगितलं होतं. तसंच लॉकडाऊनदरम्यान सार्वजनिक आणि खासगी बस सुरु ठेवण्यासही मनाई करण्यात आली आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Liquor stock, Video viral

    पुढील बातम्या