Home /News /viral /

क्या बात है! 1200 नागरिक अन् 60 घोड्यांना हरवत पठ्ठ्यानं जिंकली धावण्याची शर्यत

क्या बात है! 1200 नागरिक अन् 60 घोड्यांना हरवत पठ्ठ्यानं जिंकली धावण्याची शर्यत

जर तुम्हाला कोणी विचारलं की घोडा (Horse) आणि माणूस यांना स्पर्धेत एकत्र धावायला लावलं तर कोण जिंकेल? तर हा प्रश्न वाचून कदाचित तुम्हाला हसू येईल आणि तुमचं उत्तर असेल घोडा जिंकणार

नवी दिल्ली 17 जून : जर तुम्हाला कोणी विचारलं की घोडा (Horse) आणि माणूस यांना स्पर्धेत एकत्र धावायला लावलं तर कोण जिंकेल? तर हा प्रश्न वाचून कदाचित तुम्हाला हसू येईल आणि तुमचं उत्तर असेल घोडा जिंकणार. कारण धावण्याच्या शर्यतीत माणूस घोड्याशी कुठे स्पर्धा करू शकणार, बरोबर ना?; पण तुमचं उत्तर चुकलंय असं आम्ही म्हटल्यास तुमचा विश्वास बसेल का? तुमचं उत्तर खरंच चुकलंय. कारण एका व्यक्तीनं धावण्याच्या स्पर्धेत घोड्यालाही हरवलंय (Man beats Horse in Race). हा माणूस सध्या त्याच्या या अशक्यप्राय कामगिरीमुळे चर्चेत आहे. एका उंदरामुळे मुंबई पोलिसांना सापडलं महिलेचं 10 तोळे सोनं; चित्रपटाच्या कथेप्रमाणेच आहे संपूर्ण घटना अशक्य वाटणारा हा पराक्रम ब्रिटनचा धावपटू रिकी लाइटफूट (Ricky Lightfoot ) याने केला आहे. त्याने घोड्यांना मागे टाकत 35 किमीची शर्यत जिंकली आहे. माणूस आणि घोडे यांच्यातील ही अनोखी शर्यत ब्रिटनमधील वेल्समधील लॅनवर्टयड वेल्स (Llanwrtyd Wells) इथे आयोजित करण्यात आली होती. घोड्यांसोबतची ही शर्यत जिंकत लाइटफूटने लोकांना आश्चर्यचकित केलंय. 15 वर्षांनंतर माणसाने हरवलं घोड्यांना 37 वर्षांचा रिकी लाइटफूट कॅंब्रियामधील डेरहॅम इथे राहतो आणि तो फायरफायटर होता. या माणसाने 35 किलोमीटरची शर्यत केवळ 2 तास 22 मिनिटे 23 सेकंदात पूर्ण केली. या शर्यतीत लेन हाऊस बॉय (Lane House Boy) आणि किम अलमन (Kim Alman) नावाचे दोन घोडे उपविजेते ठरले. हिच शर्यत त्या घोड्यांनी 2 तास 24 मिनिटं 24 सेकंदात पूर्ण केली, म्हणजेच ते घोडे संपूर्ण 2 मिनिटं लाइटफूटच्या मागे होते. गेल्या 15 वर्षांपासून ही शर्यत कोणताही माणूस जिंकू शकला नव्हता. 2007 मध्ये फ्लोरियन होल्टिंगर (Florien Holtinger) नावाच्या व्यक्तीने ही शर्यत जिंकली होती आणि आता लाइटफूटने ती जिंकली आहे. Shocking Video - जंगलातून रस्त्यावर येताच सायकलस्वाराला धडकला बिबट्या; पुढे जे घडलं ते थरकाप उडवणारं 1980 पासून होतीये मॅन विरुद्ध हॉर्स (Man vs Horse) रेस ही शर्यत पहिल्यांदा 1980 मध्ये सुरू करण्यात आली होती. माणूस शर्यतीत घोड्यांना हरवू शकतो, असा विश्वास असल्याने न्यूड आर्म्स पबमधील (Neaudd Arms pub) दोन स्थानिकांनी एक पैज लावली होती. तेव्हापासून सुरू झालेली ही शर्यत 2004 साली पहिल्यांदा Huw Lobb नावाच्या व्यक्तीने 2 तास 5 मिनिटांत जिंकली होती. रिकी लाइटफूटने जिंकलेल्या शर्यतीत एकूण 1200 स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत 60 घोड्यांचा सहभाग होता. इतके घोडे आणि इतक्या लोकांना हरवत रिकीने ही शर्यत जिंकली आहे. रिकीच्या या विजयामुळे बुद्धीने प्राण्यांपेक्षा वरचढ असलेला माणूस शारीरिक क्षमतेतही प्राण्याला मात देऊ शकतो असं म्हणता येऊ शकतं.
First published:

Tags: Sports, Viral news

पुढील बातम्या