मराठी बातम्या /बातम्या /Viral /लकी ड्रॉमध्ये जिंकली 1 कोटीची कार; पण आनंद टिकलाच नाही, काहीच दिवसात भयानक अपघात झाला अन्...

लकी ड्रॉमध्ये जिंकली 1 कोटीची कार; पण आनंद टिकलाच नाही, काहीच दिवसात भयानक अपघात झाला अन्...

24 वर्षीय ग्रँट बर्नेटचं स्वप्न पूर्ण झालं, जेव्हा त्याला लकी ड्रॉमध्ये अचानक विजेता घोषित करण्यात आलं. क्लिक कॉम्पिटिशन नावाच्या लकी ड्रॉ फर्मकडून त्याने 10,000 रुपयांचे तिकीट खरेदी केले.

24 वर्षीय ग्रँट बर्नेटचं स्वप्न पूर्ण झालं, जेव्हा त्याला लकी ड्रॉमध्ये अचानक विजेता घोषित करण्यात आलं. क्लिक कॉम्पिटिशन नावाच्या लकी ड्रॉ फर्मकडून त्याने 10,000 रुपयांचे तिकीट खरेदी केले.

24 वर्षीय ग्रँट बर्नेटचं स्वप्न पूर्ण झालं, जेव्हा त्याला लकी ड्रॉमध्ये अचानक विजेता घोषित करण्यात आलं. क्लिक कॉम्पिटिशन नावाच्या लकी ड्रॉ फर्मकडून त्याने 10,000 रुपयांचे तिकीट खरेदी केले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली 28 फेब्रुवारी : अनेकदा असं घडतं जेव्हा आपल्याला यश किंवा एखादी मौल्यवान गोष्ट मिळते परंतु आपण त्याचा आनंद घेण्यापूर्वीच ती आपल्यापासून दूर जाते. नुकतंच एका माणसासोबत असंच घडलं. त्याने लकी ड्रॉमध्ये लाख नव्हे तर करोडो रुपयांची कार जिंकली होती. कारही अशी आहे की तिने अर्ध्या जगाला वेड लावलं आहे. पण त्या व्यक्तीचं नशीब इतकं वाईट निघालं की एका झटक्यात त्याच्या आनंदाचं दु:खात रूपांतर झालं.

पुराच्या पाण्यातून चालत आरामात ओलांडत होता नदी; अन्.., काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

डेली रेकॉर्ड्स न्यूज वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, स्कॉटलंडच्या फाल्किर्कमध्ये राहणाऱ्या 24 वर्षीय ग्रँट बर्नेटचं स्वप्न पूर्ण झालं, जेव्हा त्याला लकी ड्रॉमध्ये अचानक विजेता घोषित करण्यात आलं. क्लिक कॉम्पिटिशन नावाच्या लकी ड्रॉ फर्मकडून त्याने 10,000 रुपयांचे तिकीट खरेदी केले. गेल्या महिन्यात 14 जानेवारी रोजी लकी ड्रॉ जिंकल्यानंतर त्याला कार मिळाली आणि त्याने आनंदही साजरा केला.

मिळालेल्या माहितीनुसार, त्याला दोन पर्याय देण्यात आले होते. एकतर तो एक कोटी रुपये रोख घेऊ शकतो किंवा त्या रकमेची कार खरेदी करू शकतो. त्याने लॅम्बोर्गिनी कार घेतली. महागडी असण्यासोबतच लॅम्बोर्गिनी ही एक अतिशय आकर्षक कार आहे जी तरुणांना खूप आवडते. गाडी मिळाल्याने त्याला खूप आनंद झाला पण रस्ता अपघातामुळे त्याच्या आनंदावर विरजण पडलं. अपघातात त्याला काहीही झालं नाही, परंतु कारचं मोठं नुकसान झालं. कारकडे बघितलं तर असं दिसून येईल की तिचा मोठा अपघात झाला आहे.

Video : ट्रेनमध्ये सिगारेट ओढत होती तरुणी तरुणी, त्यानंतर जे घडलं ते धक्कादायक

सोशल मीडियावर त्याला ट्रोलही करण्यात आलं, पण त्यानंतर ग्रँटने स्पष्टीकरण दिलं की, ही आपली चूक नसून एका गायीची कारला धडक बसली, त्यामुळेच असा अपघात झाला. त्याने फेसबुकवर गाडीची अवस्था दाखवणारा एक व्हिडिओ पोस्ट केला पण लोक म्हणतात की ग्रँट फक्त मागील भाग दाखवत आहे ज्यात तोडफोड कमी आहे, समोरच्या भागात जास्त आहे. ज्यांच्याकडे हे महागडे वाहन नाही आणि ज्यांना त्याचा हेवा वाटतो त्याच लोकांकडून मला ट्रोल केले जात असल्याचं त्याने म्हटलं आहे.

First published:

Tags: Accident, Car