मराठी बातम्या /बातम्या /Viral /

लॉटरीत जिंकलेले 2 कोटी मिळवण्यासाठी पायी चालत ओलांडले 2 देश; एका चुकीमुळे बसला मोठा फटका

लॉटरीत जिंकलेले 2 कोटी मिळवण्यासाठी पायी चालत ओलांडले 2 देश; एका चुकीमुळे बसला मोठा फटका

ही रक्कम खूप मोठी आहे, त्यामुळे ती रोख स्वरूपात दिली जाऊ शकत नाही. यामुळे त्या व्यक्तीच्या मित्राने त्याच्यासाठी हे पैसे मिळवण्याचा प्रयत्न केला पण चोरीच्या संशयावरून तो तुरुंगात पोहोचला.

  नवी दिल्ली 17 एप्रिल : एका व्यक्तीने स्क्रॅच कार्ड विकत घेतलं. ज्यावर त्याला 2 कोटींहून अधिकचं बक्षीस मिळालं (Man Won Lottery of 2 Crore). मात्र संपूर्ण कागदपत्रांअभावी त्याला पैसे मिळू शकलेले नाहीत. त्या व्यक्तीच्या मित्रानेही पैसे काढण्याचा भरपूर प्रयत्न केला. मात्र यामुळे तो थेट तुरुंगात पोहोचला. हे प्रकरण अल्जेरियातील एका व्यक्तीशी संबंधित आहे. त्याने बेल्जियममध्ये स्क्रॅच कार्ड विकत घेतलं. बेल्जियन ब्रॉडकास्टर VRT च्या मते, बक्षीस जिंकल्यानंतरही व्यक्तीला ते मिळू शकलेलं नाही. कारण या 28 वर्षीय व्यक्तीचा बेल्जियममध्ये कायमचा रहिवासी पत्ता नाही. त्यामुळे त्याचं बँक खातं तिथे उघडता येत नाही. ज्यामध्ये रिवॉर्डची रक्कम ट्रान्सफर केली जाऊ शकेल. भरधाव कारमधून बाहेर येत थेट पुलावरुन घेतली उडी; अंगावर काटा आणणाऱ्या घटनेचा Video Viral ही रक्कम खूप मोठी आहे, त्यामुळे ती रोख स्वरूपात दिली जाऊ शकत नाही. यामुळे त्या व्यक्तीच्या मित्राने त्याच्यासाठी हे पैसे मिळवण्याचा प्रयत्न केला पण चोरीच्या संशयावरून तो तुरुंगात पोहोचला. या व्यक्तीच्या मित्राकडे सर्व कागदपत्रे होती, म्हणून तो स्क्रॅचकार्ड घेऊन ब्रुसेल्समधील लॉटरी मुख्यालयात पोहोचला. मात्र पोलिसांनी त्याला आणि त्याच्यासोबतच्या दोन जणांना चोरीच्या संशयावरून पकडलं. मात्र, नंतर त्या व्यक्तीने पोलिसांना सर्व प्रकार सांगितला आणि अखेर त्यांची तुरुंगातून सुटका झाली. अतिशय विचित्र आजाराने ग्रस्त आहे हा तरुण; सहा महिन्यात गमावल्या 4 नोकऱ्या आता लॉटरीचे विजेतं कार्ड कोर्टात जमा झालं आहे. बेल्जियमच्या मीडियानुसार, अल्जेरियन व्यक्तीने 4 महिन्यांपूर्वी आपला देश सोडला होता. तो बोटीने स्पेनला पोहोचला. यानंतर तो स्पेनहून फ्रान्समार्गे पायी बेल्जियमला ​​पोहोचला. त्या व्यक्तीचे वकील अलेक्झांडर व्हर्स्ट्रेट म्हणाले की लॉटरी कंपनी पैसे देणार नाही कारण त्या व्यक्तीचं बँक खातं नाही. मात्र, बक्षीसाची रक्कम मिळेपर्यंत त्या व्यक्तीला हद्दपार केलं जाणार नाही, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. अलेक्झांडरने एएफपी वृत्तसंस्थेला सांगितलं की - आम्ही अशा कागदपत्रांचा शोध घेत आहोत ज्यावरून त्या व्यक्तीची ओळख उघड होऊ शकेल. त्याला अल्जेरियातील त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधावा लागेल. दुसरीकडे, लॉटरीच्या प्रवक्त्याने एएफपीला स्पष्टपणे सांगितलं नाही की कोणत्या कागदपत्रांच्या आधारे त्या व्यक्तीला जिंकलेली रक्कम मिळू शकते.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Lottery, Viral news

  पुढील बातम्या