मराठी बातम्या /बातम्या /Viral /

मुलाच्या एका चुकीमुळे पालटलं पित्याचं नशीब; रातोरात झाला 7 कोटी 50 लाखाचा मालक

मुलाच्या एका चुकीमुळे पालटलं पित्याचं नशीब; रातोरात झाला 7 कोटी 50 लाखाचा मालक

51 वर्षीय प्रिन्स जॉर्जनं मेरीलँड लॉटरीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं, की तो आपल्या मुलाला शाळेत सोडवण्यासाठी जात होता. मात्र अचानक त्यांना समजलं, की त्यांच्या मुलानं कारच्या दरवाजात आपलं जॅकेट अडकवलं आहे

  • Published by:  Kiran Pharate
नवी दिल्ली 09 ऑक्टोबर : माणसाचं नशीब कधी पलटेल याचा अंदाज लावणं अवघड आहे. अनेक लोक रातोरात रस्त्यावर येतात तर अनेकजण रातोरात करोडपती बनतात. अमेरिकेच्या (America) मेरीलँडमधील एका व्यक्तीसोबतही असंच घडलं. यात मुलाच्या एका चुकीमुळे व्यक्ती 7 कोटी रुपयांचा मालक बनला. या व्यक्तीची 1 मिलियन डॉलरची लॉटरी (1 Million Dollar Lottery) लागली. चक्क ऑटोची झाली आलिशान स्कॉर्पिओ कार; VIDEO पाहून तुम्हीही चक्रावाल 51 वर्षीय प्रिन्स जॉर्जनं मेरीलँड लॉटरीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं, की तो आपल्या मुलाला शाळेत सोडवण्यासाठी जात होता. मात्र अचानक त्यांना समजलं, की त्यांच्या मुलानं कारच्या दरवाजात आपलं जॅकेट अडकवलं आहे आणि हे जॅकेट जमिनीवर फरफटत होतं. यामुळे हे जॅकेट साफ करण्यासाठी ते जवळच्याच ड्राय क्लीनरमध्ये (Dry Cleaner) पोहोचले. मुलाच्या वडिलांनी सांगितलं, की ड्राय क्लिनिंग करायला गेल्यानं त्यांच्या मुलाच्या जॅकेटमुळे त्यांना 1 मिलियन डॉलरची लॉटरी लागली. प्रिन्स जॉर्जनं म्हटलं, ड्रायक्लिनिंग सुरू असताना दुकानावर थांबून 22 सप्टेंबरला त्यांना 2 डॉलरचं लॉटरीचं तिकिट (Lottery Ticket) खरेदी केलं. पैशासाठी वृद्ध महिलेनं निवडला विचित्र पर्याय; वर्षभरात झाली करोडपती एका आठवड्यापेक्षा जास्त काळ हे तिकिट त्यांच्या घरीच पडून राहिलं. ठरलेल्या वेळी जेव्हा त्यांनी हे तिकिट आपल्या फोनवरून चेक केलं, तेव्हा त्यांना समजलं की ते 1 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 7,50,70,350 रुपये जिंकले आहेत. त्यांनी सांगितलं, की हे पाहून मला धक्काच बसला आणि मी खाली बसलो. या व्यक्तीनं सांगितलं, की या पैशाचा वापर ते आपल्या मुलांची कॉलेज फी, बिल भरण्यासाठी, कुटुंबातील सदस्यांच्या मदतीसाठी आणि सुट्ट्या घालवण्यासाठी करतील.
First published:

Tags: Lottery, Viral news

पुढील बातम्या