Home /News /viral /

एका हातात पत्नीचे कापलेलं मुंडकं, दुसऱ्या हातात चाकू आणि चेहऱ्यावर हास्य... हादरवणारा Video Viral

एका हातात पत्नीचे कापलेलं मुंडकं, दुसऱ्या हातात चाकू आणि चेहऱ्यावर हास्य... हादरवणारा Video Viral

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एका विकृत तरुणानं आपल्या पत्नीचे छिन्नविछिन्न कापलेलं मुंडकं रस्त्यावर घेऊन फिरत आहे.

    तेहरान, 09 फेब्रुवारी: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एका विकृत तरुणानं आपल्या पत्नीचे छिन्नविछिन्न कापलेलं मुंडकं रस्त्यावर घेऊन फिरत आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओनं संपूर्ण इराणला (Iran) हादरवलं आहे. पत्नीचे दुसऱ्यासोबत प्रेमसंबंध असल्याचं समजताच त्या व्यक्तीनं हे पाऊल उचललंय.17 वर्षीय मोना हेदरी (Mona Heidari) हिचा पती आणि दिरानं दक्षिण-पश्चिमी शहर अहवाजमध्ये (Southwestern City of Ahvaz) खून केल्याचा पोलिसांना संशय आहे. इराणच्या ISNA वृत्तसंस्थेनं यासंदर्भातली माहिती दिली आहे. स्थानिक पोलिसांचा हवाला देत राज्य वृत्तसंस्था IRNA नं वृत्त दिलं आहे की, सोमवारपर्यंत अधिकाऱ्यांनी त्यांच्या लपण्याच्या ठिकाणावर छापा टाकून दोन लोकांना अटक केली होती. या घटनेमुळे इराणच्या महिला प्रकरणांचे उपाध्यक्ष एन्सिह खझाली यांनी संसदेत अधिकाऱ्यांना अशा घटना टाळण्याकरिता तत्काळ उपाययोजना करण्यासाठी आणि जागरुकता वाढविण्याचं आवाहन केलं आहे. या घटनेमुळे इराणमधील लोकांमध्ये संताप इराणी वृत्तपत्रे आणि सोशल मीडियावर हत्येबद्दल धक्का आणि संताप पाहायला मिळत आहे. अनेकांनी सामाजिक आणि कायदेशीर सुधारणांचे आवाहन केलं आहे. सुधारवादी दैनिक सझांदेगी म्हणाले, एका माणसाचा शिरच्छेद करण्यात आला होता. त्याचे डोके रस्त्यावर दाखविण्यात आलं आणि मारेकऱ्याला त्याचा अभिमान वाटत होता. ते पुढे म्हणाले, अशी शोकांतिका आपण कशी स्वीकारू? पुन्हा कोणत्याही महिलेसोबत असे घडू नये यासाठी आपण कारवाई केली पाहिजे. महिलांच्या संरक्षणासाठी कायद्यात सुधारणा करण्याची मागणी लोकप्रिय स्त्रीवादी चित्रपट निर्मात्या तहमीने मिलानी (Tahmineh Milani) यांनी इंस्टाग्रामवर लिहिलं, "मोना हैदरी विनाशकारी अज्ञानाची शिकार होती. या गुन्ह्याला आपण सर्व जबाबदार आहोत. हैदरी यांच्या हत्येनंतर महिलांना कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण देण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याची आणि लग्नासाठी कायदेशीर वय वाढवण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. सध्या इराणमध्ये लग्नाचे किमान वय 13 वर्षे आहे. ऑनर किलिंगसाठी कायदेशीर त्रुटी जबाबदार इराणी मीडियाच्या म्हणण्यानुसार, पीडितेचे लग्न झाले तेव्हा ती केवळ 12 वर्षांची होती आणि तिची हत्या झाली तेव्हा तिला तीन वर्षांचा मुलगा होता. वकील अली मोजताहेदजादेह यांनी सुधारणावादी पेपर शार्गमध्ये (Reformist Paper Shargh) "कायदेशीर पळवाटा" यांना "ऑनर किलिंगला प्रोत्साहन देणं" याला जबाबदार ठरवलं आहे. दुर्दैवाने, आम्ही अशा घटना पाहत आहोत कारण महिलांवरील हिंसाचार रोखण्यासाठी कायद्यांची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी कोणतेही ठोस उपाय नाहीत, असे संसद सदस्य एलहम नदाफ (Elham Nadaf) यांनी ILNA वृत्तसंस्थेला सांगितलं. IRNA नं वृत्त दिलं की अधिकार्‍यांनी यादरम्यान Rokna ही बातमी वेबसाइट बंद केली आणि ते मानसिकदृष्ट्या अस्वस्थ समाज असल्याचं म्हटलं. दरम्यान त्याच वेबसाइटनं त्या व्यक्तीचा व्हायरल व्हिडिओ शेअर केला होता.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Iran, Shocking viral video, Viral news

    पुढील बातम्या