नवी दिल्ली 24 मार्च : वाटेत किंग कोब्रा दिसला तरी आपली अवस्था बिकट होते. त्याचा सामना करण्याची इच्छा कोणाचीच नसते. कारण त्यात इतकं विष असतं की त्याने एकदा डंक मारला तर माणसाचा जीवही जाण्याची शक्यता असते. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अमेरिकेतील एका व्यक्तीने किंग कोब्रासह 200 विषारी साप पाळले होते. एवढंच नाही तर या सापांमध्ये तीन फूट लांबीची मगरही राहायची. ही व्यक्ती फक्त सापासोबत झोपायची. मात्र एके दिवशी अचानक असं काही घडलं की त्याचा मृत्यू झाला. पोलीस घरी पोहोचताच तेही चक्रावून गेले.
जोरात धावत होता हरणांचा कळप; इतक्यात चित्त्याने मोठी उडी घेत झडप मारली अन्..., शिकारीचा VIDEO
इनसाइडरच्या रिपोर्टनुसार, पेनसिल्व्हेनियामधील एका छोट्या घराच्या आत मगरी, साप, सरडे आणि विंचू राहात होते. येथे 200 हून अधिक साप होते, त्यापैकी 60 अत्यंत विषारी होते, ज्यात दोन काळे मांबा, एक कोब्रा आणि एक रॅटलस्नेक यांचा समावेश होता. पिंजऱ्यात तीन फूट लांबीची मगर ठेवण्यात आली होती. तर, ती व्यक्ती शेजारीच मृतावस्थेत पडली होती. हे पाहून अधिकाऱ्यांचं पथक अचंबित झालं. एका व्यक्तीने इतके साप कसे पाळले असतील हे त्यांना समजलं नाही. तो या सर्वांसाठी खाण्या-पिण्याची व्यवस्था कशी करत असेल, असाही प्रश्न सर्वांना पडला.
वनविभागाचे अधिकारी जिम बोलोग्ना म्हणाले, 'मी हे यापूर्वी कधीही पाहिलं नव्हते. मी आश्चर्यचकित झालो. आपण पाहिलं आहे की कोणाकडे अनेक मांजरी असतात, अनेक कुत्री असतात, अगदी शेळ्या असतात. पण मी पहिल्यांदाच एक व्यक्ती मगरी आणि साप पाळताना पाहिली. हे पाहून संपूर्ण टीम आश्चर्यचकित झाली. या सापांना घरातून काढण्यासाठी आम्हाला आठ तास लागले'. पोलिसांनी व्यक्तीच्या मृत्यूचं कारण उघड केलं नाही, परंतु बोलोग्ना यांनी सांगितलं की, प्राथमिक तपासावरून असं दिसतं की त्या व्यक्तीला साप चावला होता. कारण तो सापासोबतच झोपायचा. मात्र, त्याचा मृत्यू सापाच्या विषाने झाला की नाही, याची पुष्टी अद्याप झालेली नाही.
बोलोग्ना यांनी सांगितलं की, या घरात राहणारे लोक सापांचा व्यापार करायचे. हे लोक काही साप 2000 डॉलर्स म्हणजेच 1.65 लाखांपर्यंत विकायचे. त्यांच्यासोबत तीन वर्षांचा मुलगाही राहत होता. मात्र चार जण व्यवसायानिमित्त बाहेर कुठेतरी गेले होते. घर खूप स्वच्छ आणि सुरक्षित होतं. सर्व प्राणी व्यवस्थित ठेवले होते. काही पिंजऱ्यातही होते. तळघरातील एका छोट्या तलावात मगरीला ठेवण्यात आलं होतं. ते पिंजऱ्यासारखं होतं. मात्र तो व्यक्ती सापांसोबत झोपायचा, असं स्थानिक लोकांचं म्हणणं आहे. तिथे विषारी साप ठेवणं बेकायदेशीर आहे. या लोकांना 1.5 कोटींपर्यंतचा दंडही होऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking news, Snake