• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • OMG! थेट जंगलाच्या राजाच्या हद्दीत घुसला तरुण, सिंहासमोर गेला आणि...; पुढे काय घडलं पाहा VIDEO

OMG! थेट जंगलाच्या राजाच्या हद्दीत घुसला तरुण, सिंहासमोर गेला आणि...; पुढे काय घडलं पाहा VIDEO

सिंहासाठी राखीव आणि माणसांसाठी प्रतिबंधित असलेल्या क्षेत्रात तो गेला पण...

 • Share this:
  तेलंगणा, 24 नोव्हेंबर : जंगलाचा राजा सिंह (Lion video) ज्याच्यासमोर किती तरी ताकदवान प्राण्यांचाही थरकाप उडतो. मग माणसांचं तर सोडाच. पण अशाच सिंहाच्या हद्दीत घुसून त्याच्यासमोर जाण्याची डेअरिंग केली ती एका तरुणाने. ही धक्कादायक घटना परदेशातील नाही तर भारतातीलच आहे. हा शॉकिंग व्हिडीओ (Shocking video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. हैदराबादच्या नेहरू प्राणीसंग्रहायलयातील (Hyderabad nehru zoological park) ही घटना. एक व्यक्ती आफ्रिकन सिंहाच्या हद्दीत केला (Man went at african lion moat area). तिथं जाऊन सिंहाच्या गुफेजवळ एका दगडावर बसला. त्याच्यासमोर सिंहसुद्धा होता. तरुण आपल्या तावडीत कधी सापडतो याचीच प्रतीक्षा सिंहही करत होता. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही अक्षरशः धडकी भरेल. व्हिडीओत पाहू शकता एक तरुण एका दगडावर बसला आहे. खाली भलामोठा सिंह उभा आहे. हा परिसर सिंहासाठी राखीव आहे. इथं जाण्यासही बंदी आहे. पण तिथंच हा तरुण गेला. हे वाचा - सिंहाच्या जबड्यातून पिल्लाला खेचलं; मातृशक्तीसमोर जंगलाच्या राजाचीही ताकद फेल तरुण वर आणि सिंह खाली, दोघंही एकमेकांकडे पाहत आहे. तरुण दगडावरून खाली उडी मारण्याच्या प्रयत्नात आहे. पण त्याच्या अगदी खालीच हा सिंह त्याची वाट पाहतो आहे. त्यामुळे तरुण तसाच दगडावर बसून राहिला आहे.  तरुण ज्या दगडावर बसला आहे, जो दगडही असा आहे की हा तरुण कधीही घसरून खाली पडला असता आणि सिंहाच्या तावडीत सापडू शकला असता. त्याची छोटीशी चूक, बेजबाबदारपणा त्याच्या जीवावर बेतला असता. सुदैवानाे प्राणीसंग्रहायलातील कर्मचारी वेळीच तिथे आले आणि त्या तरुणाला तिथून हटवलं. हे वाचा - अरेरे! जंगलाचा राजाही तिच्यासमोर भित्रा बोका; सिंहिणीने सिंहाचं काय केलं पाहा या तरुणाविरोधात प्राणीसंग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिल्याचं सांगितलं जातं आहे.
  Published by:Priya Lad
  First published: