मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO - टीव्हीत वाघाला पाहताच जीव वाचवण्याची धडपड; तरुणाने उचललं खतरनाक पाऊल

VIDEO - टीव्हीत वाघाला पाहताच जीव वाचवण्याची धडपड; तरुणाने उचललं खतरनाक पाऊल

टीव्हीतील वाघ आपल्यावर हल्ला करेल या भीतीने तरुणाने जे केलं ते पाहून डोक्याला हात लावाल.

टीव्हीतील वाघ आपल्यावर हल्ला करेल या भीतीने तरुणाने जे केलं ते पाहून डोक्याला हात लावाल.

टीव्हीतील वाघ आपल्यावर हल्ला करेल या भीतीने तरुणाने जे केलं ते पाहून डोक्याला हात लावाल.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 02 एप्रिल : वाघाला पाहून कोण घाबरणार नाही. वाघ समोर आला तर साहजिकच कुणालाही घाम फुटेल. पण काही लोक असेही असतात ज्यांना व्हिडीओमध्ये किंवा टीव्हीमध्येही वाघाला पाहून भीती वाटते. अशाच एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्याने टीव्हीत वाघाला पाहिलं आणि त्यानंतर त्याच्यापासून वाचण्यासाठी त्याने जे केलं ते पाहून तुम्हाला धक्का बसेल (Man fear after watching tiger on Tv).

दोन तरुण जमिनीवर बसून टीव्ही पाहत होते. त्यावेळी टीव्हीत अचानक वाघाची एंट्री होते. आता टीव्हीत दिसणारी  माणसं असो, प्राणी असो किंवा भूतबाहेर येणार नाहीत हे आपल्याला माहितीच आहे. पण तरी हॉरर फिल्म पाहताना आपल्याला भीती वाटतेच. त्यावेळी सामान्यपणे तुम्ही काय कराल एकतर टीव्हीचं चॅनेल बदलाल किंवा टीव्हीच बंद कराल. पण या तरुणाने जे केलं ते शॉकिंग आहे.

हे वाचा - एकट्या सिंहिणीवर तुटून पडला तरसांचा कळप; शेवटी त्यांच्यासोबत जे घडलं ते भयावह; VIDEO VIRAL

व्हिडीओत पाहू शकता जसा वाघ टीव्ही दिसतो. तसे तरुण शॉक होतात. त्यानंतर वाघ आपल्याच दिशेने चालत येत आहेत, हे पाहून त्यांना धडकी भरते. भीतीने ते उठतात. त्यातला एक तरुण काहीतरी शोधत असतो. त्याच्या हातात काठी लागते. तो काठी घेऊन टीव्हीवर मारते आणि टीव्हीच फोडतो. त्यानंतर दोघंही पुन्हा शांत बसून टीव्हीकडे एकटक पाहत राहतात.

टीव्ही फोडल्याने टीव्हीतील वाघ बाहेर येणार नाही, असं त्यांना वाटलं आणि याच मूर्खपणामुळे त्यांनी का नको तो उद्योग केला.

First published:

Tags: Viral, Viral videos