Home /News /viral /

बापरे! दोरीवरून 2 डोंगर पार करण्याचा तरुणाने केला प्रयत्न शेवटी...; काळीज घट्ट करून पाहा हा VIDEO

बापरे! दोरीवरून 2 डोंगर पार करण्याचा तरुणाने केला प्रयत्न शेवटी...; काळीज घट्ट करून पाहा हा VIDEO

Man walking on rope over dangerous hill : डोंगर ओलांडण्यासाठी तरुणाने आपला जीव धोक्यात घातला.

    मुंबई, 28 जून : डोंबाऱ्यांचा खेळ तर तुम्ही पाहिलाच असेल. दोन बाजूला खांब उभे करून त्यावर विशिष्ट उंचीवर दोरी बांधून त्यावर काठी हातात घेऊन चालणारी मुलगी. जमिनीपासून अवघ्या काही उंचीवरच ही मुलगी असते पण जेव्हा ती दोरीवरून चालते आणि तिचा तोल ढासळताना दिसतो तेव्हा आपल्या हृदयाचा ठोका चुकतो. विचार करा, असं कुणी उंच डोंगरांवर केलं तर... असाच एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे (Man walking on rope over dangerous hill). एका तरुणाने दोन उंच डोंगरावर दोरीवरून चालण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने जे ठिकाण निवडलं आहे ते इतकं भयंकर आहे की थोडा जरी त्याचा पाय घसरला तर त्याची हाडंही मिळणार नाहीत. व्हिडीओ पाहूनच धडकी भरते. व्हिडीओत पाहू शकता हे एक बर्फाळ ठिकाण दिसतं आहे. डोंगरावर पांढराशुभ्र बर्फ दिसत आहे. समान उंचीच्या दोन डोंगराच्या सर्वात उंच टोकावर एक दोरी बांधण्यात आली आहे आणि या दोरीवरून तरुण आपला तोल सावरत चालताना दिसत आहे. आजूबाजूला काहीच दिसत नाही आहे. अगदी डोंगराच्या खाली ढग आल्यासारखे दिसत आहेत. यावरूनच हा तरुण किती उंचीवर आहे, याची कल्पना येऊच शकते. तरुण चालता चालता त्याचा तोलही सुटताना दिसतो. त्याच्या एका एका पावलावर आपल्या हृदयाची धडधड वाढते. समोर दुसऱ्या डोंगरावर काही लोक उभे आहेत. तरुण कसंबसं करत अखेर त्या दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचतो. तिथं जवळ येताच तिथं असलेल्या व्यक्ती त्याला हात देऊन डोंगरावर घेतात. तेव्हा कुठे आपल्याही जीवात जीव येतो. हे वाचा - OMG! 70 वर्षीय आजी झाली 'तुफानी'; जोशात उंच पुलावरून थेट गंगा नदीत उडी मारली आणि...; Shocking Video @mdumar1989 ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटलं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Shocking video viral, Stunt video, Viral, Viral videos

    पुढील बातम्या