Home /News /viral /

Shocking! मगरींच्या कळपात घुसला एकटा माणूस; अंगावर काटा आणणारा VIDEO

Shocking! मगरींच्या कळपात घुसला एकटा माणूस; अंगावर काटा आणणारा VIDEO

एका व्यक्तीने मगरींच्या कळपात घुसण्याची डेअरिंग केली. हा व्हिडीओ पाहूनच अंगावर काटा येईल.

  मुंबई, 27 एप्रिल : मगरींशी पंगा घेण्याची हिंमत तर भलेभले प्राणीही करत नाही (Crocodile video). सिंह, बिबट्या, वाघ असे शक्तिशाली प्राणीही मगरींना किती घाबरतात हे तुम्हाला माहितीच आहे. मगरीने या प्राण्यांवर केलेल्या हल्ल्याचेही व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. अशा प्राण्यांचं मगरीसमोर काही चालत नाही तर मग माणसाचं काय? पण एका माणसाने चक्क मगरींच्या कळपात जाण्याची डेअरिंग केली (Man walking among crocodile). समोर एखादी जरी मगर दिसली तर काय होईल, या फक्त कल्पननेच घाम फुटतो. मगरीसमोर जाण्याची हिंमत कुणाचीच होणार नाही आणि ती करूही नये. कारण त्याचा परिणाम काय होईल हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. पण अशा एक-दोन नव्हे तर बऱ्याच मगरींच्या कळपात एकट्याने घुसण्याची डेअरिंग केली ती या माणसाने. त्यानंतर पुढे जे काही घडलं ते धक्कादायक आहे. हे वाचा - 2-2 शिकाऱ्यांवर भारी पडला एकटा छोटासा ससा; VIDEO पाहिल्यानंतर कधीच म्हणणार नाही भित्रा व्हिडीओत पाहू शकता सुरुवातीला दोन मगरी दिसत आहेत. त्यानंतर एका व्यक्तीचे पाय दिसतात. ही व्यक्ती या मगरींच्या जवळून चालते. व्हिडीओ पाहूनच अंगावर अक्षरशः काटा येतो. एखाद्या मगरीवर या व्यक्तीचा पाय पडला. किंवा असंच चालता चालता या मगरींनी या व्यक्तीवर हल्ला केला तर काय होईल?
  फक्त व्हिडीओ पाहून आपल्या हृदयाची धडधड वाढली असली तरी या व्यक्तीला मात्र बिलकुल भीती वाटत नाही आहे हेच या व्हिडीओतून दिसून येतं. ही व्यक्ती बिनधास्तपणे मगरींच्या मधून चालतच राहते. पुढे गेल्यावर आणखी काही मगरी दिसतात. ही व्यक्ती त्या मगरींच्या डोक्यावरून हात फिरवतानाही दिसते. शिवाय काही मगरी तर या व्यक्तीप्रमाणे त्याच्यासोबत चालतनाही दिसत आहे. हे वाचा - पाण्यात महाकाय अजगर आणि मगरीची जबरदस्त लढाई; VIDEO पाहून येईल अंगावर काटा ही व्यक्ती या मगरींमध्ये बिनधास्तपणे चालते आहे. शिवाय या मगरीही या व्यक्तीला काहीच करत नाही, हे पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. @gatorboys_chris नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिीडओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. मगरीसोबत तरुणाचा डान्स याआधी एका तरुणाचा मगरीसोबत डान्स करताना व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात एखादं कपल जसं एकमेकांचा हात हातात धरून एकमेकांमध्ये हरपून रोमँटिक डान्स करतात. अगदी तसाच डान्स हा तरुण मगरीसोबत करताना दिसला आहे.
  outofcontextanimals नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. व्हिडीओत पाहू शकता एतरुणाने मगरीच्या मानेवर आपला एक हात ठेवला आहे आणि मगरीला उभं ठरत त्याचा पुढील एक पाय आपल्या एका हातात धरला आहे. जसे कपल डान्स करताना एकमेकांसमोर असतात अगदी तसंच हा तरुण आणि मगर एकमेकांसमोर आहेत. मगरीच्या इतक्या जवळ असूनही तरुणाच्या चेहऱ्यावर बिलकुल भीती नाही आहे. मगरही त्याला काहीच हानी पोहोचवताना दिसत नाही आहे. तीसुद्धा तरुणासोबत अगदी शांत राहून त्याच्या मिठीत डान्सचा आनंद लुटताना दिसते आहे.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Crocodile, Shocking viral video, Viral, Viral videos, Wild animal

  पुढील बातम्या