अहमदाबाद, 16 मे : प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं, असं म्हणतात. सध्या एकीकडे कोरोनाशी दोनहात करण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र लॉकडाऊनमध्येही प्रेम काही कमी होत नाही आहे. एका पठ्ठ्यानं अहमदाबाद ते बनारस असा 1300 किमी चालत प्रवास केला. याचं कारण होतं एक मिस्ड कॉल.
पायी प्रवास करणारा हा मुलगा मजूर नाही किंवा परराज्यात अडकलेलाही नाही. तर फक्त आपल्या गर्लफ्रेण्डला भेटण्यासाठी यानं एवढा खटाटोप केला. द लल्लनटॉपनं दिलेल्या वृत्तानुसार, या मुलानं अहमदाबादवरून बनासर गाठवण्यासाठी पायी प्रवास केला. कारण त्याला कोणतेही वाहन मिळाले नाही. 12 मे रोजी मिर्झा मुराद पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेनं आपली मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी तपास सुरू केला. तेव्हा त्यांना मुलीचा मोबाईल ट्रेस करण्यात यश आलं.
वाचा-डॉक्टरने दाखवलं मास्क वापरण्याचं प्रात्यक्षिक, सोशल मीडियावर VIDEO VIRAL
पोलिसांना मुलगी बनारसमध्ये असल्याचं कळलं. त्यानंतर पोलिसांचं एक पथक तिथं पोहचलं, तेव्हा त्यांना मुलगी स्वत:च्या मर्जीनं मुलाला भेटण्यासाठी बनारसला गेल्याचं कळलं.
वाचा-गुगल ट्रान्सलेट आहे का? Idali Dosa Batter च्या हिंदी भाषांतराचा फोटो व्हायरलएका मिस्ड कॉलवरून झाली होती मैत्री
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांची चौकशी केल्यानंतर मुलगा बनारसचा राहणारा होता, असे कळले. मात्र कामानिमित्त तो अहमदाबादमध्ये होता. चार-पांच महिन्यांआधी एका मिस्ड कॉलवरून त्याची एका मुलीशी मैत्री झाली. त्यानंतर या दोघांनी भेटण्याचा प्लॅन केला. मुलगा अहमदाबादवरून चालत बनारसला पोहचला तर मुलगीही चालत तेथं पोहचली. दरम्यान पोलिसांनी या दोघांची चौकशी केल्यानंतर त्यांना सोडून दिलं. तर मुलीला तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आलं.
वाचा-VIDEO : लॉकडाऊनमध्ये पोटापाण्यासाठी 'या' तरुणानं केला महागातला जुगाड!
Published by:Priyanka Gawde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.