• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • 'आता पाय तुटेल पण चप्पल नाही'; तुटलेली चप्पल जोडण्यासाठी युवकाने वापरलेली शक्कल पाहून नेटकरी अवाक, VIDEO

'आता पाय तुटेल पण चप्पल नाही'; तुटलेली चप्पल जोडण्यासाठी युवकाने वापरलेली शक्कल पाहून नेटकरी अवाक, VIDEO

सध्या एका व्यक्तीचा व्हिडिओ समोर आला आहे. यात या व्यक्तीनं आपली तुटलेली चप्पल जोडण्यासाठी असा जुगाड वापरला जो पाहून तुम्हीही म्हणाल, की आता पाय तुटला तरीही चप्पल तुटणार नाही.

 • Share this:
  नवी दिल्ली 13 नोव्हेंबर : सोशल मीडियावर (Social Media) दररोज जुगाडाचे नवनवे व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत राहतात. या व्हिडिओला यूजर्सची भरपूर पसंती मिळते. हे व्हिडिओ पाहून अनेकदा आपण हैराण होतो तर अनेकदा हसू आवरत नाही. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही जुगाड करणाऱ्या या व्यक्तीच्या कामाला दाद द्याल. पत्नीनं घरात लावला सिक्रेट कॅमेरा; पतीला मैत्रिणीसोबत त्या अवस्थेत पाहून हादरली जगात सर्वात भारी लोक ते असतात ज्यांकडे कितीही अवघड काम दिलं तरीही ते सरळ पद्धतीनं न करता आपल्या अजब पद्धतीनं हे काम करतात. अशा लोकांना आपण जुगाडू म्हणतो. यांची कलाकारी पाहून काही वेळासाठी भलेभले इंजिनिअरही अवाक होतात. सध्या अशाच एका व्यक्तीचा व्हिडिओ समोर आला आहे. यात या व्यक्तीनं आपली तुटलेली चप्पल जोडण्यासाठी असा जुगाड वापरला जो पाहून तुम्हीही म्हणाल, की आता पाय तुटला तरीही चप्पल तुटणार नाही.
  View this post on Instagram

  A post shared by Tahreem Anam (@tahreemanam)

  व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती आपल्या तुटलेल्या चप्पलमध्ये नटबोल्ट फिक्स करतो. तो अशा पद्धतीनं आपली चप्पल जोडतो की आता ती कधीच सहजासहजी तुटणार नाही. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही नक्कीच अवाक व्हाल. याला म्हणतात रुबाब; हत्तीच्या पिल्लाला मिळाली Z प्लस सुरक्षा, पाहा Viral Video सोशल मीडियावर जुगाडचा हा व्हिडिओ पाहून हैराण झालेल्या अनेकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, की हे नटबोल्ट सहसा मोठ्या गोष्टी जोडण्यासाठी वापरले जातात मात्र एक गोष्ट तर नक्की आहे की हा चप्पलमध्ये लावल्याने चप्पल तर कधीच तुटणार नाही. तर आणखी एकानं लिहिलं की हा जुगाड पाहून मी फेविक्विकही विसरलो आहे. याशिवाय इतरही अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत. हा व्हिडिओ इन्स्टाग्राम यूजर @tahreemanam ने शेअर केला आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: