नवी दिल्ली, 3 डिसेंबर: चक्क एका एटीएममध्ये महिला पैसे काढत असताना त्यांच्यासमोरच (Man urinates at ATM video goes viral) तरुणाने लघवी केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. समाजात असे अनेक लोक असतात, ज्यांना सामाजिक (Lack of responsibility) जबाबदारीचं भान नसतं. आपल्या एखाद्या कृत्याचा समोरच्या व्यक्तीला किती त्रास होऊ शकतो, याची जाणीव नसते. त्याचप्रमाणे समाजात वावरताना कसं वागावं याचं भानही नसतं. असे नागरिक समाजासाठी त्रासदायक ठरतात आणि त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्यांना वाईट अनुभवांना सामोरं जावं लागतं. असाच एक प्रकार सध्या सोशल मीडियावर (Viral on social media) व्हायरल होत आहे.
DISGUSTING - Viral Video shows a man urinating inside the ATM of a Mall pic.twitter.com/tk81MJ7AGJ
— I Love Siliguri (@ILoveSiliguri) November 26, 2021
एटीएममध्ये केली लघुशंका
एका मॉलमध्ये असणाऱ्या एटीएम सेंटरमध्ये एक व्यक्ती लघुशंका करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतं. सुरुवातीला एटीएमच्या आत दोन महिला पैसे काढत असल्याचं दिसतं. त्यावेळी हा तरुण त्यांच्या आजूबाजूला फिरत आहे. काही वेळाने तो एटीएममध्ये ठेवलेल्या डस्टबिनपाशी जातो. हाताने डस्टबिन उचलून तो बाजूला ठेवतो आणि सरळ लघुशंका करायला सुरुवात करतो.
महिलांसमोर लघुशंका
या महिला एटीएममधून पैसे काढत असताना हा तरुण लघुशंका करताना दिसतो. मात्र महिला त्यावर काहीच प्रतिक्रिया देताना दिसत नाहीत. महिला शांतपणे आपलं पैसे काढण्याचं काम करत राहिल्याचं या व्हिडिओत दिसतं. हा व्हिडिओ पाहून अनेकांना शॉक बसला आहे, तर अनेकांनी किळस आल्याचं म्हटलं आहे.
हे वाचा- 28 नोव्हेंबरनंतर फक्त कल्याण डोंबिवलीतच तब्बल 76 प्रवासी परदेशातून आले
युजर्सनी विचारले सवाल
एखाद्या महिलेसमोर जर एटीएममध्ये अशा प्रकारे कुणी लघुशंका केली, तर महिलांनी त्याला आक्षेप घेतला असता किंवा किमानन निषेध करत निघून गेल्या असत्या. मात्र या व्हिडिओत महिला काहीच न करता शांत कशा का उभ्या आहेत, असा सवाल एका युजरने केला आहे. तर दुसऱ्या व्यक्तीने एटीएमच्या आतमध्ये बाथरूमची सोय करायला हवी, असा मजेशीर सल्ला दिला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: ATM, Crime, Video viral