नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : आई ही आईच असते, मग ती माणसाची असूदे की प्राण्यांची. आपली आई ज्याप्रमाणे काळजी घेते, चालायला, बोलायला, खायला शिकवते, त्याचप्रमाणे प्राण्यांमध्येही आईची मोठी भूमिका असते. प्राणीदेखील त्यांच्या पिल्लांची जीवापाड काळजी घेत असल्याचे अनेक व्हिडीओ समोर आहेत. अशाच प्रकारचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी आई अशीच असते, अशा आशयाच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हा व्हिडीओ भल्यामोठ्या मादी अजगराचा आहे. आपल्या अंड्यांचं संरक्षण करण्यासाठी मादी अजगराने केलेली धडपड या व्हिडीओमध्ये दिसते आहे.
एका टबमध्ये भलामोठा मादी अजगर आहे. त्याचा बाजूला त्याची अनेक अंडी आहेत. या अंड्यांमध्ये अजगराची पिल्लं आहेत. सापाची अंडी असतात आणि त्यानंतर त्यातून पिलांचा जन्म होतो.
व्हिडीओमध्ये मादी अजगर आपल्या अंड्यांचं रक्षण करत असते. त्याचवेळी एक व्यक्ती अजगराच्या अंड्यांना हात लावण्याचा प्रयत्न करताना दिसतो. पण मादी अजगर त्या व्यक्तीला आपल्या अंड्यांपर्यंत पोहचू न देतो त्याच्यावर हल्ला करण्यासाठी पुढे सरसावली. तो व्यक्ती अनेक प्रकारे अंड्यांना हात लावण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु अजगर मात्र त्या अंड्यांपर्यंत व्यक्तीला पोहचू देत नव्हता. अजगराने आपल्या अंड्यांची चांगली सुरक्षा करत त्या व्यक्तीला अंड्यांना स्पर्शही करू दिला नाही.
View this post on Instagram
सोशल मीडिया Instagram वर jayprehistoricpets नावाच्या एका व्यक्तीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्यांनी एक आई आपल्या पिल्लांचं कसं रक्षण करू शकते असं म्हटलं आहे. आतापर्यंत 7 लाखहून अधिक वेळा हा व्हिडीओ पाहिला गेला असून त्यावर अनेकांनी विविध प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Video viral