मराठी बातम्या /बातम्या /Viral /सिलेंडरमधून तोंडात गॅस भरत आग लावण्याचा प्रयत्न; तरुणासोबत काय घडलं पाहा..थरकाप उडवणारा VIDEO

सिलेंडरमधून तोंडात गॅस भरत आग लावण्याचा प्रयत्न; तरुणासोबत काय घडलं पाहा..थरकाप उडवणारा VIDEO

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती वेडेपणाची हद्द ओलांडत गॅस भरलेल्या सिलिंडरच्या नोझलला तोंड लावून गॅस आपल्या तोंडामध्ये घेतो. यानंतर, तो आपला चेहरा आगीकडे वळवतो आणि ..

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती वेडेपणाची हद्द ओलांडत गॅस भरलेल्या सिलिंडरच्या नोझलला तोंड लावून गॅस आपल्या तोंडामध्ये घेतो. यानंतर, तो आपला चेहरा आगीकडे वळवतो आणि ..

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती वेडेपणाची हद्द ओलांडत गॅस भरलेल्या सिलिंडरच्या नोझलला तोंड लावून गॅस आपल्या तोंडामध्ये घेतो. यानंतर, तो आपला चेहरा आगीकडे वळवतो आणि ..

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 17 मार्च : सोशल मीडियावर आपल्याला रोज अनेक आश्चर्यकारक व्हिडिओ पाहायला मिळतात. यातील काही व्हिडिओ असे असतात जे पाहून यूजर्सलाही घाम फुटतो. नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो पाहून नेटकरीही हैराण झाले. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती वेडेपणाची हद्द ओलांडून आग पेटवताना दिसत आहे. यादरम्यान तो अगदी थोडक्यात वाचतो.

स्वतःहून मृत्यूच्या दारात गेला वृद्ध; मगरीने अचानक केला हल्ला, अन् मग..Shocking Video

आग लावण्यासाठी लोक सहसा माचिस किंवा लायटर वापरताना दिसतात. त्याचबरोबर लाकूड लवकर पेटवण्यासाठी त्यात रॉकेल किंवा पेट्रोलही टाकले जाते. हे सर्व करताना काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. तसं न केल्यास व्यक्तीही आगीच्या कचाट्यात येऊ शकते. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आपल्याला असंच दृश्य पाहायला मिळतं.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती वेडेपणाची हद्द ओलांडत गॅस भरलेल्या सिलिंडरच्या नोझलला तोंड लावून गॅस आपल्या तोंडामध्ये घेतो. यानंतर, तो आपला चेहरा आगीकडे वळवतो आणि त्यावर वेगाने फुंकतो. यानंतर आगीचा मोठा भडका होतो आणि हा व्यक्ती अगदी थोडक्यात बचावतो. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनाही घाम फुटला. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. @StrangestMedia नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर या व्हिडिओनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. वृत्त लिहिपर्यंत 13 लाख पेक्षा जास्त वेळा हा व्हिडिओ पाहिला गेला आहे, तर सुमारे 49 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं की, अशा प्रकारच्या युक्त्या करणं किंवा आग लावण्याचा प्रयत्न करणं हे मृत्यूशी खेळण्यासारखं आहे. बरेच वापरकर्ते म्हणाले, की याला वेडेपणाशिवाय दुसरं काहीही म्हणता येणार नाही.

First published:
top videos

    Tags: Fire, Shocking video viral