• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • थिएटरच्या भिंतीतून येत होता जोराचा आवाज; भिंत पाडली असता आतील दृश्य पाहून सगळेच शॉक

थिएटरच्या भिंतीतून येत होता जोराचा आवाज; भिंत पाडली असता आतील दृश्य पाहून सगळेच शॉक

थिएटरच्या कर्मचाऱ्यांना आतमधून कोणीतरी भिंतीवर मारत असल्याचा आवाज येत होता. त्यांना असं वाटलं की कोणीतरी मदत मागत आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली 07 नोव्हेंबर : अनेकदा आपल्यासोबत अशा घटना घडतात ज्याची कधी कल्पनाही केलेली नसते (Incredible Incident). जुन्या काळात लोकांना शिक्षा देण्यासाठी भिंतीमध्ये गाड्यालच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. मात्र, एखादी जिवंत व्यक्ती भिंतीमध्ये अडकली तर ही नक्कीच विचित्र बाब आहे. न्यूयॉर्कमध्ये (New York) एका व्यक्तीसोबत असंच घडलं. तो भिंतीच्या आतमध्ये असलेल्या जागेत दोन दिवस अडकला होता (Man Trapped Naked Inside Wall). 'आधी मॅगी मग लग्न, नवरदेवाला सांगा...'; खादाड नवरीबाईचा मजेशीर VIDEO थिएटरच्या कर्मचाऱ्यांना आतमधून कोणीतरी भिंतीवर मारत असल्याचा आवाज येत होता. त्यांना असं वाटलं की कोणीतरी मदत मागत आहे. यानंतर त्यांनी मदतीसाठी घटनास्थळी फायरफायटर्स बोलावले. भिंत फोडून या व्यक्तीला बाहेर काढण्यात आलं. मात्र प्रत्येकाच्या डोक्यात एकच सवाल होता, की हा व्यक्ती इथे पोहोचला कसा? BBC च्या वृत्तानुसार, जेव्हा रेस्क्यू टीमने ही भिंत पाडून या व्यक्तीला बाहेर काढलं तेव्हा त्यानं कोणतेही कपडे घातलेले नव्हते. सायराक्यूज फायर डिपार्टमेंटने फेसबुकवर ही घटना शेअर करत सांगितलं, की हा व्यक्ती भिंतीच्या मागे असलेल्या छोट्या जागेत कसा गेला, हे कोणालाही समजलं नाही. असं म्हटलं जात आहे, की हा व्यक्ती आधीपासूनच लँडमार्क थिएटरच्या आसपास फिरत होता. Syracuse.com सोबत बोलताना थिएटरचे डायरेक्टर माईक इंट्रगलिटा यांनी सांगितलं, की कदाचित बाथरूमचा वापर करण्यासाठी हा व्यक्ती इथे आला होता. 60 वर्षांनंतर महिलेला मिळाली BFने लिहिलेली ती प्रेमपत्रं; वाचा इमोशनल Love Story अग्निशमन विभागाचे डेप्युटी चीफ जॉन केन यांनी सांगितले की, ही व्यक्ती एका छोट्या ठिकाणी 2 दिवसांपासून अडकली होती. पोलिसांचे म्हणणे आहे की त्या व्यक्तीला काहीतरी मानसिक आजार आहे, त्यामुळे त्याच्यावर कोणताही आरोप लावला गेला नाही. याआधीही एक व्यक्ती विना कपडे सिटी सेंटरजवळ सनबाथ करताना दिसला होता. आता पुन्हा एकदा ही घटना समोर आल्याने सार्वजनिक ठिकाणावरील सुरक्षिततेबाबत सवाल उपस्थित केला जात आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: