• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • सुनेचा चेहरा पाहून सासूला आली चक्कर; शुद्धीवर येताच नव्या नवरीची घरातून हकालपट्टी

सुनेचा चेहरा पाहून सासूला आली चक्कर; शुद्धीवर येताच नव्या नवरीची घरातून हकालपट्टी

एका आगळ्यावेगळ्या लग्नाची (Marriage) सध्या चर्चा सुरू आहे. या घटनेत एका तरुणानं किन्नरसोबत लग्नगाठ बांधली (Man Tied Knot With Shemale) आहे.

 • Share this:
  पाटणा 27 जून: एका आगळ्यावेगळ्या लग्नाची (Marriage) सध्या चर्चा सुरू आहे. या घटनेत एका तरुणानं किन्नरसोबत लग्नगाठ बांधली (Man Tied a Knot With Shemale) आहे. मात्र, लग्नानंतर नवरी जेव्हा आपल्या सासरी पोहोचली, तेव्हा तिचा चेहरा पाहून सासू बेशुद्ध झाली. जेव्हा सासूचे डोळे उघडले तेव्हा तिनं आपल्याला हे लग्न मान्य नसल्याचं सांगितलं. समाजाच्या भीतीनं तिनं आपल्या मुलाला आणि सुनेला घराच्या बाहेर काढलं. ही घटना बिहारच्या (Bihar) सासाराम जिल्ह्यातील करगहर येथील आहे. सहाव्या फेऱ्यानंतर बदललं नवरीचं मन; लग्नास नकार देण्याचं कारण ऐकून व्हाल हैराण किन्नरसोबत लग्न केल्यानं या युवकाच्या घरात एकच गोंधळ उडाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, करगहरचा गोलू पूर्वी डान्स पार्टीत काम करायचा. या दरम्यान तो पानापूर येथील रहिवासी किन्नर नंदानी हिच्या प्रेमात पडला. दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आणि लग्न केलं. लग्नानंतर गोलू आपल्या किन्नर पत्नीसोबत करगहरमधीलच एका खोलीत भाड्यानं राहात होता. कुटुंबीयांना या गोष्टीची माहिती मिळाल्यानंतर त्यांना दबाव टाकून आपल्या मुलाला किन्नर असलेल्या सुनेपासून वेगळं करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानं नकार दिल्यानं त्याची समजूत काढून त्याला घरी आणण्यात आलं. भर लग्नात नवरीची करामत; VIDEO पाहून आवरणार नाही हसू नंदनीला या गोष्टीची माहिती मिळताच ती गोलूच्या शोधात त्याच्या घरी पोहोचली. इथे किन्नर असलेल्या सुनेला पाहून सासूला चक्कर आली. स्थिती तेव्हा आणखी बिघडली जेव्हा नंदनी आपल्या सासूच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडून तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करू लागली. हे दृश्य पाहून लोक आपल्या आपल्या घरी परतू लागले. मात्र, डोळे उघडताच सासूनं आपल्या सुनेला घरातून बाहेर काढलं. यानंतर दोघंही पती-पत्नी जवळच्या एका नातेवाईकाच्या घरी निघून गेले.
  Published by:Kiran Pharate
  First published: