Home /News /viral /

एक्स-गर्लफ्रेंडच झाली सावत्र आई; या कारणामुळे तरुणीने बॉयफ्रेंडच्या वडिलांसोबतच केलं लग्न

एक्स-गर्लफ्रेंडच झाली सावत्र आई; या कारणामुळे तरुणीने बॉयफ्रेंडच्या वडिलांसोबतच केलं लग्न

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

अमेरिकेतल्या 51 वर्षांच्या व्यक्तीनं त्याच्या मुलाच्या एक्स गर्लफ्रेंडबरोबरच (Ex Girlfriend marries Ex Boyfriend’s Father) लग्न केलं. ऐकून धक्का बसेल अशीच ही घटना आहे.

नवी दिल्ली 01 जुलै : प्रेम आंधळं असतं. प्रेम कुणाचंही कुणावरही होऊ शकतं, असं म्हटलं जातं. आपल्याला अनेक अशा घटना पाहायलाही मिळतात. अनेक विजोड जोडपी आपल्या आजूबाजूला आपल्याला दिसतात. अमेरिकेतील ओहयो राज्यात अशीच एक विचित्र घटना समोर आली आहे. झी न्यूजच्या वेबसाईटवर याबाबतची अधिक माहिती देण्यात आली आहे. अमेरिकेतल्या 51 वर्षांच्या व्यक्तीनं त्याच्या मुलाच्या एक्स गर्लफ्रेंडबरोबरच (Ex Girlfriend marries Ex Boyfriend’s Father) लग्न केलं. ऐकून धक्का बसेल अशीच ही घटना आहे. गंमत म्हणजे ही मुलगी त्याच्यापेक्षा 24 वर्षांनी लहान आहे. या तरुणीनं आपल्या एक्स बॉयफ्रेंडच्या (Ex Boyfriend) वडिलांशीच लग्न केल्याच्या या बातमीची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. म्हणजेच एक्स गर्लफ्रेंड (Ex Girlfriend) चक्क या तरुणाची सावत्र आई झाली आहे. 'नवरा भाड्याने देणं आहे', बायकोने सोशल मीडियावर दिली जाहिरात; कारणही आहे शॉकिंग या तरुणीचं नाव सिडनी डीन आहे. ती 27 वर्षांची आहे. ट्रक ड्रायव्हर पॉलबरोबर तिनं लग्न केलं. तो ट्रक ड्रायव्हर असणं यात काही विशेष नाही. पण या जोडप्यात तब्बल 24 वर्षांचं अंतर (Age Difference 24 years) आहे आणि त्याहीपेक्षा विशेष म्हणजे पॉलच्या मुलाची सिडनी ही एक्स-गर्लफ्रेंड आहे. जेव्हा ती पॉलला पहिल्यांदा भेटली तेव्हा ती फक्त 11 वर्षांची होती आणि त्यावेळेस ती पॉलच्या मुलाला डेट करत होती. त्यानंतर दोघं वेगळे झाले पण त्यांच्यात मैत्री कायम होती. मात्र पुढे भविष्यात आपण आपल्या एक्स बॉयफ्रेंडची सावत्र आई होऊ असा विचार सिडनीनं स्वप्नातदेखील केला नसेल. आपला बॉयफ्रेंड एका वेगळ्याच मुलीला डेट करत असल्याचं सिडनीला समजलं तेव्हा तिला खूप वाईट वाटलं होतं. तिनं त्याच्या वडिलांबरोबर या विषयावर काही दिवस चॅटिंग केलं.‘मी कधी पॉलच्या प्रेमात पडेन असं मला वाटलं नव्हतं. आम्ही अगदी वेगळ्याच पद्धतीने भेटलो. मी पॉलशी लग्न केलं याचा मला खूप आनंद आहे,’ अशी प्रतिक्रिया सिडनीनं दिली आहे. कोरोनामुळे वडील गमावलेल्या मुलीला लग्नात मिळालं खास गिफ्ट,VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी सिडनी 16 वर्षांची झाली तेव्हा तिनं पॉलशी लग्न केलं. ओहयो राज्यात 16 वर्षांनंतर डेटिंगला परवानगी आहे. त्यांनी 2016 मध्ये लग्न केलं. अर्थात या दोघांमध्ये 24 वर्ष इतकं मोठं अंतर असल्यानं त्यांना भरपूर टीकाही सहन करावी लागली. आपलं प्रेम अगदी खरं आहे हे कुटुंबीयांना समजावणं त्यांना अगदी अवघड गेलं. पण म्हणतात ना प्रेम कुणाचंही कुणावरही बसू शकतं.
First published:

Tags: Marriage, Wedding

पुढील बातम्या