Home /News /viral /

बापरे! तरुणाने चक्क सिंहालाच केल्या गुदगुदल्या; काय परिणाम झाला तुम्हीच पाहा VIDEO

बापरे! तरुणाने चक्क सिंहालाच केल्या गुदगुदल्या; काय परिणाम झाला तुम्हीच पाहा VIDEO

सिंह पाणी पित असताना त्याच्या पाठीमागे जाऊन तरुणाने त्याला गुदगुदल्या केल्या. त्यानंतर सिंह चवताळला.

    मुंबई, 25 जून : सिंह आणि जंगलातील इतर प्राण्यांच्या गोष्टी तुम्हाला माहितीच असतील. गोष्टीतच नव्हे तर प्रत्यक्षातही भलेभले प्राणी सिंहासमोर जाण्याची हिंमत करत नाही. अशाच सिंहाशी चक्क एका माणसाने मस्करी करण्याचा प्रयत्न केला. कुत्रा, मांजराला गुदगुदल्या कराव्या तसं एक तरुण चक्क जंगलाचा राजा सिंहाला गुदगुदल्या करायला गेला (man tickle lion while drinking water video). शेवटी त्याचा परिणाम जो झाला तो पाहून तुम्हालाही धक्का बसेल  (Man prank lion viral video). एका तलावात सिंह पाणी पित असताना त्याच्याशी पंगा घेण्याचा प्रयत्न तरुणाने केला.  व्हिडीओत पाहू शकता सिंह तलावात पाणी पितो आहे. तेव्हा एक व्यक्ती मागून हलक्या पावलांनी येतो. सिंहाच्या मागे येऊन तो उभा राहतो. त्यानंतर आपल्या दोन्ही हातांनी सिंहाला गुदगुदल्या करू लागतो. गुदगुदल्या होताच सिंह चवताळवतो आणि मागे वळतो. त्याचवेळी आपल्या हृदयाचा ठोका चुकतो. आता या व्यक्तीचं काही खरं नाही असंच वाटतं. पण पुढे जे घडलं ते धक्कादायक आहे. सिंह चवताळलेला असतानाही ही व्यक्ती घाबरत नाही उलट ती हसताना दिसते आणि आश्चर्य म्हणजे सिंहसुद्धा त्या व्यक्तीला काहीच करत नाही. आपल्या रागावर तो कंट्रोल करतो. हे वाचा - VIDEO - मगरींचं साम्राज्य असलेल्या पाण्यात स्विमिंगसाठी उतरला तरुण आणि...; कॅमेऱ्यात कैद झालं भयावह दृश्य ही व्यक्ती जंगली प्राण्यांचं संरक्षण, मदत करणारी असावी. म्हणजे ती अशा प्राण्यांच्या संपर्कात असते त्यामुळे तिला सिंहाची भीती वाटत नाही आहे. सिंह आणि ही व्यक्ती कायम एकत्र राहत असावेत त्यामुळे सिंहालाही त्याची सवय झाली असावी. दोघांमध्ये मैत्री असावी त्यामुळेच सिंहानेही त्याच्यावर हल्ला केला नसावा. @TheFigen ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटिझन्स हैराण झाले आहेत. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. एका युझरने एक दिवस हा सिंह या व्यक्तीचा जीव घेईल असं म्हटलं आहे. तर एकाने तर नक्कीच या व्यक्तीचा जीव गेला असावा, असा दावा केला आहे. तर एका युझरने या व्यक्तीचं नाव डीन असून तो लहानपणासूनच सिंह पाळतो आणि त्यांच्यासोबत वेळ घालवतो अशी माहितीही दिली आहे. हे वाचा - Shocking! आकाशातून थेट जमिनीवरील कारवर कोसळलं विमान; भयंकर अपघाताचा VIDEO VIRAL तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेमकं काय वाटलं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Viral, Viral videos, Wild animal

    पुढील बातम्या