• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • रद्दी समजून व्यावसायिकाने कचऱ्यात फेकले 16 लाख रूपये; चूक समजताच केला पोलिसांना फोन पण...

रद्दी समजून व्यावसायिकाने कचऱ्यात फेकले 16 लाख रूपये; चूक समजताच केला पोलिसांना फोन पण...

या व्यक्तीनं चुकून 16 लाख रूपये कचऱ्याच्या डब्यात फेकले (Man Thrown 16 Lakh Cash In Dustbin). बिजनेसमध्ये गुंतण्यासाठी त्याने 16 लाख रूपये कॅश काढले होते.

 • Share this:
  नवी दिल्ली 06 नोव्हेंबर : असं म्हटलं जातं, की चुका (Mistakes) माणसांकडूनच होतात. जगात असे लोक फारच कमी असतील ज्यांच्याकडून चुका होत नाहीत. असं म्हटलं जातं की माणसानं जर चुका केल्या नाहीत तर तो देवच बनेल. माणूस आपल्या चुकांमधूनच शिकत असतो. मात्र, अनेकदा माणसाकडून अशा काही चुका घडतात, ज्या त्याला आयुष्यभरासाठी धडा देऊन जातात. मात्र, नशीब चांगलं असेल तर वेळ असतानाच या चुका सुधारताही येतात. असाच एक नशीबवान व्यवसायिक ग्रीसमधून समोर आला आहे. या व्यक्तीनं चुकून 16 लाख रूपये कचऱ्याच्या डब्यात फेकले (Man Thrown 16 Lakh Cash In Dustbin). रेस्टॉरंटनं लॉन्च केलं मानवी मांसाची चव असलेलं बर्गर; खाण्यासाठी लोकांची गर्दी हा व्यक्ती ग्रीक आयलँड ऑफ लेमन्समध्ये राहतो. बिजनेसमध्ये गुंतण्यासाठी त्याने 16 लाख रूपये कॅश बाहेर काढला होता. हे पैसे बँकेत जमा करण्याच्या उद्देशाने तो बॅगेत भरून घेऊन जात होता. मात्र याच बॅगसोबत त्यानं कचऱ्याची बॅगही ठेवली. रस्त्यात असलेल्या एका मोठ्या डम्प्स्टरमध्ये त्यानं कचऱ्याच्या पिशव्या फेकल्या. यानंतर तो आपल्या ऑफिसमध्ये पोहोचला. मात्र इतक्यात त्याच्या लक्षात आलं की त्याच्याजवळ दोन बॅगमध्ये कॅशही होता. या बॅग त्याला गाडीमध्ये आढळल्या नाहीत. लगेचच त्याला आपली चूक समजली. प्राणीसंग्रहालयानं माकडाला दिली सिगारेट,मुक्या प्राण्याची अवस्था पाहून भडकले लोक चूक लक्षात येताच त्यानं याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांसोबत मिळून त्यानं डम्प्स्टरपासून कचऱ्याच्या गाडीचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. या गाडीत संपूर्ण कचरा भरण्यात आला होता. नशीब चांगलं असल्यानं ही गाडी सापडली. यानंतर पोलिसांनी आणि या व्यक्तीनं मिळून गाडीतील संपूर्ण कचरा रस्त्यावर खाली करण्यास सांगितला आणि यात त्या बॅग्स शोधण्यास सुरुवात केली. या व्यक्तीच्या नशिबाने इथेही त्याची साथ दिली. काही वेळ शोध घेतल्यानंतर त्याला या दोन्ही कचऱ्याच्या बॅग सापडल्या. लोकांना जेव्हा या घटनेबद्दल समजलं तेव्हा सर्वांनीच या व्यक्तीच्या लकचं कौतुक केलं.
  Published by:Kiran Pharate
  First published: