मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO - ज्वालामुखीच्या तोंडावर उभं राहून तरुणाने फेकला भलामोठा दगड; पुढे जे घडलं ते अंगावर काटा आणणारं

VIDEO - ज्वालामुखीच्या तोंडावर उभं राहून तरुणाने फेकला भलामोठा दगड; पुढे जे घडलं ते अंगावर काटा आणणारं

तरुणाने ज्वालामुखीत दगड फेकताच जे घडलं ते पाहून धडकी भरेल.

तरुणाने ज्वालामुखीत दगड फेकताच जे घडलं ते पाहून धडकी भरेल.

एक दगड टाकून झोपलेल्या ज्वालामुखीला तरुणाने जागं केलं.

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 20 ऑगस्ट : ज्वालामुखीचे बरेच व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. व्हिडीओतच ज्वालामुखीतील तपता लाव्हा पाहून आपल्याला घाम फुटतो. काही लोक ज्वालामुखीचा उद्रेक ज्या ठिकाणी झाला आहे, त्याठिकाणी अभ्यासासाठी किंवा पाहण्यासाठी म्हणून जातात. तिथं प्रत्यक्ष जाऊन ज्वालामुखी पाहतात. हे ठिकाण तसं खतरनाक पण तरी काही लोक मुद्दामहून अशा धोक्याला आमंत्रण देतात. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर होतो आहे. पाण्यात जसा दगड टाकावा तसा एका तरुणाने चक्क ज्वालामुखीत भलामोठा दगड टाकला. ज्वालामुखीच्या तोंडावर उंचावर उभं राहून त्याने स्थिर झालेल्या ज्वालामुखीत दगड टाकला. त्यानंतर जे घडलं ते धडकी भरवणार आहे. व्हिडीओ पाहूनच तुमच्या अंगावर काटा येईल. व्हिडीओत पाहू शकता ज्वालामुखीच्या तोंडावर दोन व्यक्ती उभ्या आहेत. त्यापैकी एक व्यक्ती एक भलामोठा दगड आपल्या हातात घेते आणि त्या ज्वालामुखीत फेकते. वरून दगड वेगाने येऊन ज्वालामुखीत धाडकन आदळतो. सुरुवातीला आगीची एक ठिणगी उडाल्यासारखं दिसतं. या ठिणग्या वाढत जातात आणि हळूहळू ज्वालामुखी उसळतो. हे वाचा - निसर्गाचा अद्भुत चमत्कार! आकाशात वाहू लागला ढगांचा धबधबा; कधीच पाहिला नसेल असा VIDEO शांत झोपलेला ज्वालमुखी पुन्हा जागा होता. ज्वालामुखीतून तपता लावा फुटताना दिसतो. आता या ज्वालामुखीचा उद्रेक होणार असंच वाटतं. पण शेवटी नेमकं काय घडलं ते या व्हिडीओत दिसत नाही. हा स्लिपिंग ज्वालामुखी आहे, जो सर्वात खतरनाक मानला जातो. सामान्यपणे ज्वालामुखीचे प्रामुख्याने तीन प्रकार असतात. एक अॅक्टिव्ह ज्वालामुखी ज्याचा नुकताच उद्रेक झालेला असतो आणि त्यातून लाव्हा बाहेर पडत असतो, तो पुन्हा फुटू शकतो. दुसरा एक्सटिंक्ट ज्वालामुखी म्हणजे जो बऱ्याच वर्षांपूर्वी अॅक्टिव्ह झाला होता पण तो आता सुकला आहे आणि पुन्हा त्याचा उद्रेक होणार नाही आणि तिसरा म्हणजे स्लिपिंग ज्वालामुखी जो सर्वात खतरनाक असतो कारण त्याचा बऱ्याच कालावधीपासून उद्रेक झालेला नसतो आणि कधीचीही त्यांचा ब्लास्ट होऊ शकतो. तर स्लिपींग ज्वालमुखीला हलवण्याचा प्रयत्न केला तर ते अॅक्टिव्ह होऊ शकतात. जसं या व्हिडीओत दिसतं आहे. हे वाचा - भारतातील 'या' ठिकाणी आहे एलियन्सचा वावर, येथे दडलंय मोठं रहस्य @TheFigen ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
First published:

Tags: Shocking viral video, Viral, Viral videos

पुढील बातम्या