मुंबई 18 मार्च : ऑनलाइन प्रेमाची आणखी एक वेदनादायक कहाणी समोर आली आहे. ज्यात एका महिलेनं अवघ्या 20 दिवसात ऑनलाइन ओळख झालेल्या प्रियकराशी लग्न केलं, पण त्यानंतर तिची इतकी फसवणूक झाली की ती आयुष्यभर विसरू शकणार नाही. या महिलेची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली. तिचा नवरा तिच्या दोन पाळीव गायींना घेऊन पळून गेल्याची तक्रार महिलेनं पोलिसात केली तेव्हा ही गोष्ट उघडकीस आली.
Shocking! 3 वर्षांचा लेक तडफडत होता तरी आई VIDEO बनवत राहिली, चिमुकल्याचा गेला जीव
ही घटना चीनच्या एका प्रांतातील आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी ही महिला एका ऑनलाइन अॅपवर त्या पुरुषाला भेटली होती. महिलेने त्याच्याशी बोलायला सुरुवात केली आणि ते भेटलेही. या महिलेला गायी पाळण्याची आवड होती आणि तिने दोन महागड्या गायी आपल्या घरी ठेवल्या होत्या. दुसरीकडे, त्या व्यक्तीला महिलेबद्दल सर्व काही कळालं आणि त्याने महिलेशी लग्न करण्यासाठी होकार दिला.
महिलेकडे काही शेत देखील होतं, ज्याची ती स्वतः मालक होती. खरं तर त्या महिलेने ज्या व्यक्तीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता, ती व्यक्ती फसवणूक करणारी होती. त्याला महिलेच्या गायी विकून पैसे मिळवायचे होते आणि शेवटी हेच झालं. दोघांचं लग्न झालं आणि दोघंही महिलेच्या फार्म हाऊसवर राहू लागले. दरम्यान, त्या नवऱ्याने महिलेची फसवणूक करण्याचा कट रचला.
शेवटी असं झालं की त्याने त्या महिलेच्या काही मौल्यवान वस्तू आणि त्या दोन गायी विकल्या आणि तिथून पळ काढला. महिलेला सत्य समजल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगण्यात आलं आहे की, लग्न झाल्यापासून हा पुरुष महिलेला ब्लॅकमेल करत होता आणि त्याने खूप पैसेही उकळले होते. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marriage, Viral news