मराठी बातम्या /बातम्या /Viral /तब्बल 856 फुटांवरून फेकला बास्केटबॉल, पुढे काय झालं? तुम्हीच पाहा Video

तब्बल 856 फुटांवरून फेकला बास्केटबॉल, पुढे काय झालं? तुम्हीच पाहा Video

Worlds Highest Basketball Shot

Worlds Highest Basketball Shot

फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्युब यांसारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स लोकांना त्यांचं टॅलेंट लोकांसमोर दाखवण्यासाठी हक्काचं ठिकाण बनले आहेत.

  नवी दिल्ली, 25 मे: फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्युब यांसारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स लोकांना त्यांचं टॅलेंट लोकांसमोर दाखवण्यासाठी हक्काचं ठिकाण बनले आहेत. इथून ते लोकांपर्यंत सहज पोहोचू शकतात आणि आपल्या अनोख्या कलेचं प्रदर्शन करू शकतात. भन्नाट क्रिएटिव्हीटीचे अनेक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. असंच एक 'Dude Perfect' नावाचं चॅनल आहे. यामध्ये एक तरुण एका खेळाबद्दल विविध प्रयोग करतो व वर्ल्ड रेकॉर्ड बनवतो. आताही त्याच्या अशाच एका रेकॉर्डची चर्चा आहे. तो नेमकं काय करतो याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात. या संदर्भात 'हिंदुस्थान टाइम्स'ने वृत्त दिलंय.

  युट्युबर 'Dude Perfect' हा बास्केटबॉलच्या अविश्वसनीय ट्रिक शॉट्ससाठी ओळखला जातो. होय, तो बास्केटबॉलचे असे शॉट्स टाकतो ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. नुकताच पुन्हा एकदा त्याने एक शॉट टाकला आणि वर्ल्ड रेकॉर्ड रचला. त्याने तब्बल 856 फूट उंचीवरून बास्केटबॉल खाली फेकून तो हुपमधून पार केला. त्याच्या या कृतीमुळे लोक खूप प्रभावित झाले आहेत आणि त्याच्या या पराक्रमाची दखल गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनेही (GWR) घेतली आहे.

  "जगातील हाय्येस्ट बास्केटबॉल शॉट," असं लिहून युट्युबरने व्हिडिओ शेअर केलाय. त्याने शेअर केलेल्या युट्युबर व्हिडिओत तो त्याचे जुने वर्ल्ड रेकॉर्ड सांगतोय, तसंच या शॉटसाठी त्याने व त्याच्या टीमने केलेली तयारीही दाखवत आहे. या वेळी त्यांनी त्यांच्या मित्रांना व्हिडिओ कॉलदेखील केला. त्यापैकी एक म्हणतो की हे वैज्ञानिकदृष्ट्या अशक्य आहे आणि त्याने परफेक्ट शॉट केल्यास मी तो बास्केटबॉल खाईन, असंही म्हणतो.

  व्हिडिओ जसजसा पुढे जातो, तसतसं प्रेक्षकांना ड्युड परफेक्टने या पूर्वी केलेले सर्व बास्केटबॉल स्टंट पाहायला मिळतात. एक परफेक्ट शॉट बनवण्याचा प्रयत्न करताना ते किती वेळा अयशस्वी होतात हेदेखील यात दाखवण्यात आलंय. व्हिडिओचा शेवट ड्युड परफेक्टने बास्केटबॉलचा परफेक्ट शॉट टाकून रेकॉर्ड रचल्यावर होतो. हा शॉट रचल्यावर त्याचा व त्याच्या टीमचा आनंद पाहण्यासारखा असतो.

  " isDesktop="true" id="891510" >

  हा व्हिडिओ चार दिवसांपूर्वी शेअर करण्यात आला होता. पोस्ट केल्यापासून व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय. आत्तापर्यंत त्याला जवळपास 4.5 मिलियन व्ह्युज मिळाले आहेत. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय, तसेच युजर्स त्यावर लाइक्स व कमेंट्सचाही वर्षाव करत आहेत. “हे लीजेंडरी आहे,” असं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना लिहिलंय. “कधीही वाटलं नव्हतं की मला 18 मिनिटांचा एक व्हिडिओ इतका आवडेल, ज्यात ते फक्त एक शॉट टाकतात," असं एका युजरने म्हटलंय. काहींना व्हिडिओतील स्टोरीटेलिंग प्रचंड आवडलं. एकाने “अप्रतिम व्हिडिओ! शाब्बास मित्रांनो!!” असं म्हणत या टीमचं कौतुक केलंय. "मी तुम्हाला सुमारे 8 वर्षांपासून पाहतो आणि हा मी आतापर्यंत पाहिलेला सर्वोत्तम शॉट आहे!" असं आणखी एकाने म्हटलंय. खूप छान! आणि विश्वास बसत नाही की तुम्ही ते प्रत्यक्षात करून दाखवलंय,” असंही एका युजरने म्हटलंय.

  First published:
  top videos

   Tags: Social media viral, Viral, Viral videos