मुंबई, 24 जानेवारी : स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणं किंवा आ बैल मुझे मार... अशा कितीतरी व्यक्ती आहेत ज्या स्वतःहून स्वतःवर संकट ओढावून घेतात. आपल्यासमोर जे आहे ते काहीच नाही, असं समजून काही लोक तिथं हात टाकतात आणि मग त्यांना ते चांगलंच भारी पडतं. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जिथं एका तरुणाने साधीसुधी समजून एका मेंढीशी पंगा घेतला. पण ते त्याला चांगलंच महागात पडलं.
एकिकडे वाघ, सिंह, बिबट्या अशा जंगली प्राण्यांच्या नावानेच आपल्याला घाम फुटतो. तर दुसरीकडे कुत्रा, मांजर, घोडा, बकरी, मेंढी असे पाळीवर प्राणी आपल्याला काहीच करणार नाहीत म्हणून काही लोक त्यांना त्रासही द्यायला मागेपुढे पाहत नाही. या तरुणानेही तेच केलं. मेंढी आपल्याला काहीच करणार नाही असं समजून त्याने एका मेंढीला छेडलं, पण त्याचा डाव त्याच्यावरच उलटला.
हे वाचा - संतप्त हत्ती JCB चा चुराडा करायला गेला पण...; विचारही केला नसेल असा VIDEOचा शेवट
व्हिडीओत पाहू शकता, एक मेंढी उभी आहे, तिच्याजवळून एक व्यक्ती जाते. ती त्या मेंढीला विनाकारण छेडते. मग मेंढी या व्यक्तीला सोडते की काय? ती त्याची पाठ धरते. त्याच्या मागे धावत धावत जाते आणि टक्कर मारण्याचा प्रयत्न करते.
सुरुवातीला ही व्यक्ती मेंढीवरून उडी मारत आपला बचाव करते. पण मेंढी काही मागे हटत नाही. ती पुन्हा पुन्हा या व्यक्तीवर हल्ला करायला जाते. त्या त्यावेळी व्यक्ती आपला बचाव करते. अखेर या व्यक्तीला आपला जीव वाचवण्यासाठी उंचावर जावं लागतं. ही व्यक्ती मेंढीला चढता येणार नाही, अशा उंचावर जाऊन उभी राहते.
हे वाचा - पाळीव श्वानाला वाचवण्यासाठी अस्वलासोबत भिडला व्यक्ती; धडकी भरवणारा VIDEO
hepgul5 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून त्यावर वेगवेगळ्या कमेंट येत आहेत. कुणी हा व्हिडीओ मजेशीर असल्याचं म्हटलं आहे. तर कुणी कुणालाही हलक्यात घेऊ नये, असा सल्ला दिला आहे. तर काहींनी असं कुणालाही त्रास देणं योग्य नसल्याचं म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.