मुंबई, 19 मे : सध्याच्या डिजिटल युगात महिला किंवा मुलींचे चोरून फोटो काढून त्याचा गैरवापर करण्याचं प्रमाण वाढलं आहे. अनेकदा सार्वजनिक ठिकाणी असे फोटो कोणी काढत असलं तर सहजपणे लक्षात येत नाही आणि आलंच तरी अनेकदा महिला किंवा मुली भीतीनं गप्प राहतात. मात्र अशा एका व्यक्तीचा पाठलाग करून त्याला रंगेहाथ पकडून फोटो डिलीट करायला लावणाऱ्या धाडसी मुलींचा (girl catichin एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
एका विमानतळावर(Airport)घडलेली ही घटना आहे. दोन मैत्रिणी विमानतळावर एका ठिकाणाहून दुसरीकडे जात असताना एका व्यक्तीनं त्यांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. पाठलाग करता करता त्यानं त्यांच्या नकळत त्या दोघींचे फोटो (Photos) काढण्यासही सुरुवात केली. आजूबाजूच्या लोकांनी या मुलींच्या ते लक्षात आणून दिलं. ते कळताच या दोघींनी त्या माणसासमोर उभं ठाकायचं ठरवलं आणि त्या सरळ त्या माणसाकडे गेल्या आणि तो त्यांचे फोटो का काढत आहे असा सवाल त्याला केला.
Man in Arizona is caught stalking and photographing two young women pic.twitter.com/8psypVwOzR
— Marjorie Gaylor Queen (@Tim_Tweeted) May 3, 2021
आम्हाला तुझा कॅमेरा दाखव ,असंही त्यांनी त्याला सांगितलं. त्या माणसानं त्याला नकार देताच, जर तू फोटो काढले नाहीस तर कॅमेरा दाखवायला काय अडचण आहे असं विचारायला सुरुवात केली. सार्वजनिक (Public Place) ठिकाणी परवानगीशिवाय (Permission) कोणाचेही फोटो काढणं चुकीचं आहे. आमच्या जागी तुझ्या बहिणी किंवा जवळच्या व्यक्ती असत्या तर त्यांना कस वाटलं असतं? असा सवाल करत त्यांनी अगदी ठामपणे फोटो डिलीट (Delete) करण्याची मागणी केली. ते केल्याशिवाय मागं हटायचं नाही असा चंगच त्या दोघींनी बांधला होता.
हे वाचा - 'काँक्रिटच्या रस्त्यामध्येच अडकलं मुलीचं अर्ध शरीर...'; PHOTO पाहून नेटकरी हैराण
त्या माणसानं तिथून निघून जाण्याचा प्रयत्न केला. पण या दोघींनी त्याचा पिच्छा न सोडता त्याला कॅमेरा दाखवण्याचा तगादा सुरूच ठेवला. अखेर त्या आपला पिच्छा सोडणार नाहीत हे लक्षात आल्यानंतर त्यानं आपण फोटो काढल्याचं कबूल केलं आणि ते फोटो डिलीट करण्याचं मान्य केलं. तेव्हा या दोघींनी त्याची चांगलीच खरडपट्टी काढली आणि ताबडतोब त्यांच्यासमोर फोटो डिलीट करण्याची मागणी केली. त्या माणसानं या दोघींचे पाच फोटो काढल्याचं दिसून आलं. शेवटी या दोघी मुलींनी त्याला ते डिलीट करायला लावले.
हे वाचा - फेक वेडिंग फोटोशूट; नवरा मुलगाही भाड्याने घेतला, एक्स-बॉयफ्रेंडशी असा घेतला बदला
हा सगळा प्रसंग त्यांनी आपल्या स्मार्टफोनवर शूट केला आणि टिकटॉकवर शेअर केला. जो सोशल मीडियावर व्हायरल होतो होतो. @Tim_Tweeted या ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ एरिझोनातील असल्याचं या ट्विटर युझरने सांगितलं आहे. न घाबरता अशा विकृत माणसासमोर अगदी धीटपणे उभं राहून त्याला अद्दल शिकवल्याबद्दल या मुलींचं कौतुक होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Photo, Viral, Viral videos