Home /News /viral /

खतरनाक मगरीला मांडीवर घेऊन खेळवताना दिसला व्यक्ती; VIDEO बघूनच फुटेल घाम

खतरनाक मगरीला मांडीवर घेऊन खेळवताना दिसला व्यक्ती; VIDEO बघूनच फुटेल घाम

व्हिडिओमध्ये एक व्यक्ती महाकाय मगरीसोबत अगदी आरामात खेळताना दिसत आहे. त्याच्याकडे पाहून असं वाटतं जणू तो मगरीला एक खेळणं समजत आहे.

  नवी दिल्ली 25 एप्रिल : ज्याप्रमाणे सिंहाला 'जंगलाचा राजा' म्हटलं जातं, त्याचप्रमाणे मगरीला 'पाण्याचा राजा' म्हटलं जातं. मगरीच्या बलाढ्य जबड्यात कोणी अडकलं तर त्याचं वाचणं जवळपास अशक्यच होऊन जातं (Crocodile Attack). कारण मगर आपल्या शिकारीला अगदी काही मिनिटात फाडून खाते. यामुळेच सिंहदेखील मगरीसोबत पंगा घेण्याआधी विचार करतो. मात्र सध्या मगरीचा एक असा व्हिडिओ व्हायरल (Crocodile Shocking Video) झाला आहे, जो पाहून लोक हैराण झाले आहेत. नवरदेवाने 'कुबूल है' म्हणताच नवरीचा आनंद गगनात मावेना; केलं असं काही की वेडिंग हॉलमध्ये पिकला हशा, Video व्हिडिओमध्ये एक व्यक्ती महाकाय मगरीसोबत अगदी आरामात खेळताना दिसत आहे. त्याच्याकडे पाहून असं वाटतं जणू तो मगरीला एक खेळणं समजत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती मगरींनी भरलेल्या हौदात उतरतो. यानंतर तो एका विशालकाय मगरीला उचलून आपल्या मांडीवर घेतो.
  हे दृश्य खरोखरच हैराण करणारं आहे. हा व्हिडिओ पाहून कोणाचाही थरकाप उडेल. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचं नाव क्रिस्टोफर जिलेट असल्याचं सांगितलं जात आहे. तो वाइल्ड लाइफ बायोलॉजिस्ट आणि कन्जर्वेशनिस्ट आहे. क्रिस्टोफर जिलेट आपल्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरुन सतत मगरींचे नवनवे व्हिडिओ शेअर करत असतो. आता समोर आलेला हा व्हिडिओ धडकी भरवणारा आहे. VIDEO शूट करण्यात मग्न होती तरुणी; मागून आलेल्या हत्तीनं केलेलं कृत्य पाहून पुरती घाबरली मगरीचा हैराण करणारा हा व्हिडिओ discovercrocodiles नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये यूजरने लिहिलं, जिला नावाची ही मगर 136 किलो वजनाची आहे. एक दिवसाआधी अपलोड केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत साडेसहा हजारहून अधिकांनी लाईक केला आहे. हा आकडा वाढतच आहे. तर अनेकांनी व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Crocodile, Shocking video viral

  पुढील बातम्या