Home /News /viral /

VIDEO - मगरींचं साम्राज्य असलेल्या पाण्यात स्विमिंगसाठी उतरला तरुण आणि...; कॅमेऱ्यात कैद झालं भयावह दृश्य

VIDEO - मगरींचं साम्राज्य असलेल्या पाण्यात स्विमिंगसाठी उतरला तरुण आणि...; कॅमेऱ्यात कैद झालं भयावह दृश्य

तरुण स्विमिंगसाठी पाण्यात उतरताच मगरींनी त्याच्यावर भयंकर हल्ला केला.

    मुंबई, 24 जून : स्विमिंग पूलमध्ये पोहोताना आपल्या लाडक्या कुत्र्याला, मांजराला घेऊन पोहोण्याची सवय अनेकांना असते. मात्र मगरींसह (Crocodile) कुणी स्विमिंग केल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? ज्या पाण्यात मगर आहे, तिथं कुणाला जायलादेखील दिलं जात नाही. मग समोर पाहिली की अंगाचंही पाणीपाणी होतं. मग अशा मगरींसह कोण स्विमिंग करेल, असाच प्रश्न तुम्हालाही पडला असेल (Man swimming with crocodile video). तुम्ही-आम्ही कुणीही मगरीसोबत स्विमिंग करण्याची साधी कल्पनाही करू शकत नाही. तशी डेअरिंग एका व्यक्तीने केली. मगरी असलेल्या पाण्यात ही व्यक्ती उतरली. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (social media viral video) होतो आहे. व्हिडीओत पाहू शकता आधीपासूनच मगरी असलेल्या या पाण्यात ही व्यक्ती आहे. ती अगदी पाण्याच्या मधोमध नाही. मात्र पाण्याच्या किनाऱ्याजवळ आहेत. एका लाकडाला त्याने पकडलं आहे. हे वाचा - आता काय म्हणावं! सुंदर दिसण्याच्या नादात तरुणाने चक्क साबणच कचाकचा चावून खाल्ला; VIDEO VIRAL त्यानंतर दोन मगरी या व्यक्तीच्या जवळ आल्या. या व्यक्तीच्या मनात तशी भीती दिसतेय. मात्र आधी तिला वाटलं मगर आपल्याला काहीच करणार नाही. मगरदेखील अगदी शांतपणे या व्यक्तीच्या जवळ आली. तिने थेट हल्ला केला नाही. जवळ आल्यानंतर आधी हळूच जणू त्या व्यक्तीचा पापा घ्यावा असंच तिनं काही केलं आणि अचानक आपला भला मोठा जबडा उघडून त्या व्यक्तीला आपल्या तोंडात घेण्याचा प्रयत्न केला. व्यक्तीने तात्काळ आपले हातपाय हलवून त्या मगरीला दूर केलं आणि लगेच पाण्याबाहेर आली. ही डेअरिंग त्याच्या जीवावर चांगलीच बेतली असती. सुदैवानं या व्यक्तीसोबत तसं काही झालं नाही. हे वाचा - Electric Car Fire Video : स्कूटरपाठोपाठ आता इलेक्ट्रिक कारही पेटली; मुंबईच्या रस्त्यावर Tata Nexon EV जळून खाक @AwardsDarwin_ ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. जो पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Crocodile, Viral, Viral videos, Wild animal

    पुढील बातम्या