मराठी बातम्या /बातम्या /Viral /

OMG! तरुणाने स्वतःच्या शरीरावर सपासप फिरवली तलवार; अंगावर काटा आणणारा VIDEO

OMG! तरुणाने स्वतःच्या शरीरावर सपासप फिरवली तलवार; अंगावर काटा आणणारा VIDEO

तरुणाने तलवारीसोबत केलेला खतरनाक स्टंट पाहून सर्वजण हैराण झाले आहेत.

तरुणाने तलवारीसोबत केलेला खतरनाक स्टंट पाहून सर्वजण हैराण झाले आहेत.

तरुणाने तलवारीसोबत केलेला खतरनाक स्टंट पाहून सर्वजण हैराण झाले आहेत.

    मुंबई, 01 ऑगस्ट :  तलवारबाजीचे बरेच व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. एका व्यक्तीचा तलवारीसोबत असाच खतरनाक स्टंट करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. व्हिडीओ पाहूनच तुमच्या अंगावर अक्षरशः काटा येईल. या व्यक्तीने चक्क आपल्या शरीरावर सपासप तलवार फिरवली आहे (Man balancing sword viral video). आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात एक व्यक्ती शरीरावर ज्या पद्धतीने तलवार बॅलेन्स करते, ते पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. व्हिडीओत पाहू शकता या व्यक्तीच्या हातात भलीमोठ, लांबलचक तलवारआहे. तलवार तो आपल्या शरीरावर सपासप फिरवतो. शरीरावर तलवार बॅलेन्स करताना दिसतो. सुरुवातीला खांद्यावरून पाठीवर नेत त्यानंतर तो पायांवर तलवार आणतो. तलवार शरीरावर ठेवून तो हवेत स्वतः फिरतोसुद्धा. पाहताच आपल्या काळजाचा ठोका चुकतो. एकाग्रता, कुशलता आणि वर्षानुवर्षांची प्रॅक्टिस. जणू तलवार त्याच्या शरीराचं एक अंगच आहे... असं कॅप्शन दिपांशू यांनी हा व्हिडीओ पोस्ट करताना दिलं आहे. हे वाचा - WOW! कबुतराचं कधीच पाहिलं नसेल असं रूप; अद्भुत टॅलेंट पाहून थक्क व्हाल; Watch Video तलवारीसोबत तरुणाचा खतरनाक स्टंट पाहून सर्वांनी तोंडात बोटं घातली आहे. एका युझरने याला अद्भुत म्हटलं आहे. काहींनी या युझरचं कौतुक केलं आहे. तर काहींना यावर विश्वासच बसत नाही आहे. त्यांनी याला थ्रीडी अॅनिमेशन असल्याचं म्हटलं आहे. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Stunt video, Viral, Viral videos

    पुढील बातम्या