मराठी बातम्या /बातम्या /Viral /

भरधाव ट्रकवर 'शक्तिमान'सारखा स्टंट तरुणाला पडला भारी; काय भयंकर अवस्था झाली पाहा VIDEO

भरधाव ट्रकवर 'शक्तिमान'सारखा स्टंट तरुणाला पडला भारी; काय भयंकर अवस्था झाली पाहा VIDEO

भरधाव ट्रकवर शक्तिमानसारखा स्टंट करणाऱ्या तरुणाची इतकी भयंकर अवस्था झाली ज्याचा त्याने स्वप्नातही विचार केला नसेल.

भरधाव ट्रकवर शक्तिमानसारखा स्टंट करणाऱ्या तरुणाची इतकी भयंकर अवस्था झाली ज्याचा त्याने स्वप्नातही विचार केला नसेल.

भरधाव ट्रकवर शक्तिमानसारखा स्टंट करणाऱ्या तरुणाची इतकी भयंकर अवस्था झाली ज्याचा त्याने स्वप्नातही विचार केला नसेल.

  • Published by:  Priya Lad
लखनऊ, 18 जुलै : आपणही हिरोसारखी एका हाताने गाडी उचलू शकलो तर, आपल्यालाही सुपरहिरो स्पायडरमॅनसारखं भिंतीवर चढता आलं असतं तर आणि शक्तिमानसारखं गोल गोल फिरता आलं असतं तर... हिरो, सुपरहिरोंना पाहून बहुतेकांना असं वाटतंच. पण काही लोक तर त्याला प्रत्यक्षात करण्याचाही प्रयत्न करतात. हिरो, सुपरहिरोसारखं स्टंट करायला जातात आणि ते त्यांना चांगलंच महागात पडतं. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Lucknow Man perform stunt on truck falls video). एक तरुण शक्तिमान बनायला गेला. चालत्या ट्रकवर तो शक्तिमानसारखा स्टंट करायला गेला, पण त्यानंतर त्याची अवस्था इतकी भयंकर झाली ज्याचा त्याने स्वप्नातही विचार केला नसेल. व्हिडीओत पाहू शकता चालत्या ट्रकवर एक तरुण दिसतो आहे. ट्रकचा वेग खूप आहे. तरी तरुण ट्रकवर विचित्र विचित्र हरकती करताना दिसतो. सुरुवातीला तो पुशअप्स मारतो. त्यानंतर उभा राहतो. नंतर उभ्या उभ्या शक्तिमानसारखी पोझही देतो. त्याचवेळी ट्रकवरून त्याचा पाय घसतो आणि तो थेट रस्त्यावर येऊन कोसळतो. हे वाचा - Shocking Video! 220 किलो वजन उचलताच फाटली छाती; बॉडी बनवण्याच्या नादात झाली भयंकर अवस्था यानंतर व्हिडीओत पुढे तरुणाचे काही फोटो आहेत. ज्यात चालत्या ट्रकवर स्टंट करताना रस्त्यावर कोसळल्यानंतर तरुणाची काय अवस्था झाली ते दाखवण्यात आलं आहे. त्याच्या शरीरावर बऱ्याच जखमा दिसत आहेत. त्याला गंभीर दुखापत झालं आहे. इतकी की तो आता नीट बसूही शकत नाही. उत्तर प्रदेशच्या गोमतीनगरमधील ही घटना आहे. लखनऊच्या अतिरिक्त पोलीस उपायुक्त श्वेता श्रीवास्तव यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर नागरिकांना जागरूक करण्यासाठी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. बनत होत शक्तिमान, काही दिवस होऊ शकत नाही विराजमान. कृपया असे जीवघेणे स्टंट करू नका, असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. हे वाचा - बाप रे बाप! गगनचुंबी इमारतीवर इतका Dangerous stunt; हार्ट कमजोर असेल तर जपूनच पाहा हा VIDEO व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. एका युझरने शक्तिमानच्या शरीरातील अंग शरीरातून बाहेर आले, असं म्हटलं आहे. तर एका युझरने अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून नेमकं काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.
First published:

Tags: Stunt video, Viral, Viral videos

पुढील बातम्या