मुंबई, 27 जुलै : हत्ती शरीराने अवाढव्य असला तरी शांत प्राणी. तो वन्य प्राणी असला तरी त्याची तितकी भीती वाटत नाही, जितकी इतर जंगली प्राण्यांना पाहून वाटते. आपल्याला आपल्या परिसरातही कधीतरी हत्ती दिसतो. त्यामुळे हत्तीला पाहून कुणीच लगेच घाबरत नाही. उलट तो आपल्या क्युट वाटतो. पण हाच क्युट वाटणारा हत्ती चवताळला तर काही खरं नाही. अशाच एका चवताळलेल्या हत्तीसमोर एक व्यक्ती छाती ताणून उभी राहिली. पुढे जे घडलं ते पाहून तुम्ही हैराण व्हाल.
चवताळलेल्या हत्तींचे, हत्तींच्या हल्ल्याचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण हा व्हिडीओ थोडा वेगळा आहे. यात हत्ती चवताळलेला आहे, त्याने माणसावर हल्ला करण्याचा प्रयत्नही केला. माणसावर तो धावून येताच त्यानंतर जे काही घडलं ते शॉकिंग आहे. व्हिडीओ पाहूनही तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.
व्हिडीओत पाहू शकता दोन व्यक्ती जाताना दिसत आहेत. समोरून एक भलामोठा हत्ती येतो. हत्ती तसा सुरुवातीला शांत आहे, तो आपल्या मार्गाने शांतपणे चालत जातो आहे. पण जसं तो माणसांना आपल्या दिशेने येताना पाहतो तसं तो संतप्त होतो आणि त्या माणसांवर धावून जात त्यांच्यावर हल्ला कऱण्याचा प्रयत्न करतो.
हे वाचा - VIDEO - बापरे! सर्कसमध्ये ट्रेनरवरच अस्वलाचा भयंकर हल्ला; जीव वाचवण्यासाठी धडपडला पण...
आता हत्ती हल्ला करण्यासाठी येताना दिसला की कुणीही घाबरून आपला जीव वाचवण्यासाठी त्याच्यापासून दूर पळण्याचा प्रयत्न करेनं. पण या दोन्ही व्यक्ती तसं काहीच करत नाहीत. उलट ते दोघंही त्या हत्तीसमोर छाती ताणून उभे राहतात आणि हत्तीच्या डोळ्यात डोळे घालून पाहतात.
Not panicking is the best self-defense method! pic.twitter.com/ygSWAOow7X
— Figen (@TheFigen) July 26, 2022
अरे काय हा चमत्कार! काही क्षणापूर्वी भडकलेला हत्ती लगेच शांत होतो. जसा तो धावत आला तसाच तो मागे जातो. हल्ला करण्यासाठी तो व्यक्तीच्या समोर येतो पण हल्ला करत नाही. हल्ला न करताच मागे फिरतो.
हे वाचा - VIDEO - समोर फणा काढून आला कोब्रा; बाळाने खेळणं म्हणून हातात धरला आणि अवघ्या 30 सेकंदात...
या व्यक्तीने हात न लावता, छाती ताणून समोर उभं राहून या हत्तीला शांत केलं आहे. व्हिडीओ तुम्ही नीट पाहिला तर या व्यक्तीच्या हातात बंदूक आहे, ती बंदूक तो फक्त आपल्या खांद्यावर ठरतो. ज्याला पाहून हत्ती थांबतो आणि घाबरून तो मागे फिरतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Elephant, Viral, Viral videos, Wild animal