मराठी बातम्या /बातम्या /Viral /

गळ्यात विशालकाय अजगर गुंडाळून बागेत फिरू लागला तरुण, Viral Video पाहून येईल अंगावर काटा

गळ्यात विशालकाय अजगर गुंडाळून बागेत फिरू लागला तरुण, Viral Video पाहून येईल अंगावर काटा

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ क्लिपमध्ये दिसतं, की एक व्यक्ती गार्डनमध्ये गळ्यात भलामोठा साप घेऊन फिरत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ क्लिपमध्ये दिसतं, की एक व्यक्ती गार्डनमध्ये गळ्यात भलामोठा साप घेऊन फिरत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ क्लिपमध्ये दिसतं, की एक व्यक्ती गार्डनमध्ये गळ्यात भलामोठा साप घेऊन फिरत आहे.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 06 डिसेंबर : साप (Snake) दिसायला लहान असो किंवा मोठा, मात्र तो समोर दिसताच अनेकांची घाबरगुंडी उडते. मात्र एका व्यक्तीने भल्यामोठ्या अजगराला आपल्या गळ्याच्याभोवती असं गुंडाळलं आहे, जणू ते एखादं खेळणं आहे. विशेष म्हणजे यादरम्यान साप तरुणावर हल्लाही करत नाही. सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होणारा हा काहीच सेकंदांचा व्हिडिओ (Viral Video of Python) पाहून तुमचाही थरकाप उडेल. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की अजगर किती भीतीदायक आणि विशालकाय दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून लोक हैराण झाले आहेत. काहींनी हा वेडेपणा असल्याचं म्हटलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ क्लिपमध्ये दिसतं, की एक व्यक्ती गार्डनमध्ये गळ्यात भलामोठा साप घेऊन फिरत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हा अजगर किती घातक दिसत आहे. मात्र, या व्यक्तीला अजगराची अजिबातही भीती वाटत नाहीये. कॅमेऱ्यात पाहून तो हसताना दिसत आहे. विशालकाय अजगराकडे पाहून अंदाज येतो की तो किती जड असेल. मात्र, तरीही हा व्यक्तीला सापाला गळ्याभोवती गुंडाळून आऱामात गार्डनमध्ये फिरत आहे.

हा व्हिडिओ काही सेकंदाचाच आहे. मात्र, सोशल मीडिया यूजर्सच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. हा हैराण करणारा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर royal_pythons_ नावाच्या अकाऊंटवरुन शेअऱ केला गेला आहे. यूजरने याला कॅप्शन देत लिहिलं, घट्ट मित्र. हा व्हिडिओ पाहून लोक यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांना हा व्हिडिओ मजेशीर वाटला, तर अनेकांनी चिंताही व्यक्त केली आहे. काहींचं असं म्हणणं आहे की साप हा सापच असतो. तो कोणाचा मित्र नसतो. त्यामुळे अशा जीवांपासून लांब राहाणंच चांगलं आहे.

एका यूजरने कमेंट करत लिहिलं, भारताबाहेरचे लोक काहीही करू शकतात. तर आणखी एकाने सल्ला देत म्हटलं की सापासारख्या जीवांसोबत खेळणं योग्या नाही. कितीही काही केलं तरी ते कधीही हल्ला करू शकतात. याशिवाय इतरही अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.

First published:

Tags: Python snake, Snake video