मराठी बातम्या /बातम्या /Viral /

विशालकाय अजगरासोबत मस्ती पडली महागात; पुढच्याच क्षणी तरुणाची झाली भयंकर अवस्था, Shocking Video

विशालकाय अजगरासोबत मस्ती पडली महागात; पुढच्याच क्षणी तरुणाची झाली भयंकर अवस्था, Shocking Video

Python Viral Video: व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ क्लिपमध्ये एक तरुण भल्यामोठ्या अजगराला आपल्या खांद्यावर ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसतो. मात्र पुढच्याच क्षणी आपल्यासोबत काय होणार आहे, याचा अंदाजही त्याला नव्हता

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 23 डिसेंबर : सापाचं नाव ऐकताच अनेकांना घाम फुटतो. सापाने चावा घेतल्यास अनेकांचा जीवही जातो. याच कारणामुळे केवळ माणूसच नाही तर मोठमोठे प्राणीही सापाला पाहून आपला रस्ता बदलतात. मात्र एका व्यक्तीने मस्ती करण्यासाठी चक्क विशालकाय अजगरालाच आपल्या खांद्यावर घेतलं (Video of Man Playing With Python). यानंतर जे काही घडलं ते पाहून तुमच्याही हृदयाचा ठोका चुकेल. हा व्हिडिओ (Shocking Video of Python) पाहून सोशल मीडिया यूजर्स हैराण झाले आहेत. काहींनी या व्यक्तीच्या कृत्याला वेडेपणा म्हटलं आहे तर काहींनी म्हटलं की साप कधीच माणसाचे मित्र होऊ शकत नाहीत.

VIDEO: पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीला वाचवायला हत्तीने जे केलं ते पाहून वाटेल कौतुक

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ क्लिपमध्ये एक तरुण भल्यामोठ्या अजगराला आपल्या खांद्यावर ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसतो. तुम्ही पाहू शकता की हा साप किती मोठा आणि भीतीदायक आहे. या अजगराला खांद्यावर घेताच तरुणाच्या चेहऱ्यावर हसू येतं. मात्र पुढच्याच क्षणी आपल्यासोबत काय होणार आहे, याचा अंदाजही त्याला नव्हता. अजगर लगेचच एखाद्या गोष्टीला विळखा घालतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे.

View this post on Instagram

A post shared by طبیعت (@nature27_12)

या घटनेतही अगदी असंच घडलं. अजगराने या तरुणालाच विळखा घालायला सुरुवात केली. पाहता पाहता त्याची अवस्था खराब होऊ लागली. हे पाहून आसपासच्या लोकांनी त्याला अजगराच्या तावडीतून सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. हे दृश्य खरंच हैराण करणारं आहे.

काहीच सेकंदाचा हा हैराण करणारा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर nature27_12 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. काहीच तासात 2 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत. अनेकांनी या मुलाच्या कृत्याला वेडेपणा म्हटलं आहे, तर अनेकांना या अजगराचा रंग आवडला आहे.

Chandrapur: हुसकावण्यासाठी गेलेल्या गावकऱ्यांवर चवताळला वाघ अन्.., Live Video

एका यूजरने या व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं, की साप कधीच माणसांचे मित्र होऊ शकत नाहीत, असं करणं म्हणजे वेडेपणा आहे. तर दुसऱ्या यूजरने लिहिलं, या अजगराला पाहून असं वाटतं की तो कोणालाही एका झटक्यात गिळून घेईल. आणखी एकाने कमेंट करत लिहिलं, हा मुलगा वेडा आहे. याशिवाय इतरही अनेकांनी व्हिडिओवर निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

First published:

Tags: Python snake, Snake video