मराठी बातम्या /बातम्या /Viral /

लस घेताच ढसाढसा रडू लागला; रडक्या तरुणाला पाहून नर्सही हैराण, पाहा VIDEO

लस घेताच ढसाढसा रडू लागला; रडक्या तरुणाला पाहून नर्सही हैराण, पाहा VIDEO

एक मजेशीर व्हिडिओ (Funny Video) सध्या समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

एक मजेशीर व्हिडिओ (Funny Video) सध्या समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

एक मजेशीर व्हिडिओ (Funny Video) सध्या समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

    नवी दिल्ली 18 ऑगस्ट : कोरोनाचा (Coronavirus) प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून लसीकरणावर (Corona Vaccination) भर दिला जात आहे. देशभरात लसीकरण मोहिमेला वेग आला आहे. अधिकाधिक नागरिकांना लवकरात लवकर लस देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र, अजूनही अनेकजण असे आहेत ज्यांच्या मनात लसीबाबत अनेक गैरसमज किंवा भीती आहे आणि याच कारणामुळे ते लस घेणं टाळत आहेत. सोशल मीडियावर (Social Media) लसीकरणाचे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल (Viral Video of Vaccination) होत असतात. काही व्हिडिओ हैराण करणारे तर काही खळखळून हसवणारे असतात. असाच आणखी एक मजेशीर व्हिडिओ (Funny Video) सध्या समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. VIDEO: हवेतच लष्काराच्या विमानानं घेतला पेट; कॅमेऱ्यात कैद झाला तो थरारक क्षण व्हिडिओमध्ये दिसतं, की एक तरुण कोरोनाची लस घेण्याआधी प्रचंड घाबरला आहे. डॉक्टर त्याला लस देण्याचा प्रयत्न करतात मात्र हा तरुण ज्या पद्धतीनं ड्रामा करतो ते पाहून समजतं की तो आधीपासूनच घाबरलेला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक युवक लस घेण्यासाठी आला आहे. डॉक्टरांनी त्याला लस देताच तो जोरजोरानं ओरडू लागतो. एवढा मोठा व्यक्ती अशा पद्धतीनं ओरडताना पाहून आजूबाजूचे सर्वच लोक आणि डॉक्टर हसू लागतात. हा व्यक्तीदेखील लस घेतल्यानंतर आपलं डोकं पकडून बाजूला जातो. VIDEO - लग्नाच्या दिवशीच नवरीमुळे झाले हाल; नवरदेवाला अक्षरश: फुटला घाम सोशल मीडियावर या युवकाचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. लोक हा व्हिडिओ एकमेकांसोबत शेअर करण्याबरोबरच यावर निरनिराळ्या कमेंटही करत आहेत. एका यूजरनं याला ओव्हर अॅक्टिंग म्हटलं आहे तर दुसऱ्या एकानं म्हटलं, की ‘इसे कहते हैं फोबिया’. हा मजेशीर व्हिडिओ फेसबुकवर Vivek Kumar नावाच्या यूजरनं शेअर केला आहे. बातमी देईपर्यंत याला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Corona vaccine, Funny video

    पुढील बातम्या