Home /News /viral /

डोळ्याची पापणी न मिटता एकटक तासभर सूर्याकडे बघत राहिला हा व्यक्ती; पाहून तुम्हीही व्हाल थक्क

डोळ्याची पापणी न मिटता एकटक तासभर सूर्याकडे बघत राहिला हा व्यक्ती; पाहून तुम्हीही व्हाल थक्क

एमएस वर्मा यांचा हा विक्रम असाच बनलेला नाही. तर याच्यासाठी गेल्या 25 वर्षांपासून त्यांनी सराव केला आहे.

    नवी दिल्ली 09 डिसेंबर : उन्हाचा तडाखा सहन करणं सगळ्यांनाच शक्य नाही. सूर्याच्या तीव्र प्रकाशाकडे 5 सेकंदही पाहणे आपल्याला कठीण होते. अशा स्थितीत जर एखादी व्यक्ती तासभर सूर्याकडे पाहत असेल (Man Stares into Sun Without Blinking) तर हा पराक्रम खरोखरच थक्क करणारा आहे. आपल्या देशातील एका वयोवृद्ध व्यक्तीने सूर्याकडे एकटक पाहत अनोखा विक्रम केला आहे (Man Sets National Record). 70 वर्षीय सेवानिवृत्त सरकारी अधिकारी एमएस वर्मा यांनी चष्मा न लावता तासभर सूर्याकडे पाहिलं. या काळात त्यांनी एकदाही पापण्या मिचकावल्या नाहीत. उत्तर प्रदेशातील या वृद्धाच्या साधनेने राष्ट्रीय विक्रम केला आहे. डॉक्टरांच्या उपस्थितीत त्यांनी हा विक्रम केला आणि इंडियाज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये (India’s Book of Records) आपलं नाव नोंदवलं. हेही वाचा - दही खाण्यासाठी पाकिस्तानी चालकाने मध्येच थांबवली ट्रेन; VIDEO पाहून व्हाल शॉक एमएस वर्मा यांचा हा विक्रम असाच बनलेला नाही. तर याच्यासाठी गेल्या 25 वर्षांपासून त्यांनी सराव केला आहे. एका गुरुजींमुळे प्रभावीत होऊन आपण हा पराक्रम केल्याचं त्यांनी सांगितलं. यासाठी डॉक्टर आणि इंडियाज बुक ऑफ रेकॉर्डच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ते थेट सूर्यासमोर बसले आणि डोळे न मिटवता 1 तास त्याच्याकडे टक लावून पाहत राहिले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांचे डोळे पूर्णपणे निरोगी आहेत. याआधी एका व्यक्तीने डोळे न मिटता 10 मिनिटे सूर्य पाहण्याचा विक्रम केला होता, परंतु एमएस वर्मा यांचा हा विक्रम त्यापेक्षा खूप मोठा आहे. आता त्यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपल्या पराक्रमाची नोंद करायची आहे. हेही वाचा - निसर्गरम्य ठिकाणी फोटो काढायला आवडतं? मग या तरुणीसोबत घडलेली घटना बघाच, VIDEO सूर्याकडे पाहिल्याने डोळ्यांत वेदना होतात आणि रेटिना खराब होण्याचा धोका देखील असतो, असं म्हटलं जातं. तरीही या 70 वर्षांच्या वृद्धाला याचा काहीच त्रास झाला नाही. तासभर उघड्या डोळ्यांनी सूर्याकडे पाहिल्यानंतर ते हसत होते आणि फोटोसाठी पोजही देत ​​होते. ते सूर्याकडे पाहण्याचे अनेक फायदेही सांगतात. अनेक योगगुरूही डोळ्यांवर उपचार म्हणून अशा प्रकारे सूर्याकडे पाहण्याचा सल्ला देतात.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Record, Viral news

    पुढील बातम्या