Home /News /viral /

याला म्हणतात दोस्ती! 165 कोटींची लॉटरी लागल्यावरही निभावली मैत्री, मित्राला केला फोन आणि...

याला म्हणतात दोस्ती! 165 कोटींची लॉटरी लागल्यावरही निभावली मैत्री, मित्राला केला फोन आणि...

165 कोटींची लॉटरी लागल्यावर मित्राला फोन करून 28 वर्षांपूर्वीचे हे वचन पूर्ण केलं.

    विस्कॉन्सिन, 27 जुलै : जीवनात पैसा मोठा की मैत्री? असा प्रश्न कोणालाही विचारल्यास पैसा असे उत्तर येईल. मात्र या दोन मित्रांची बातमी वाचल्यानंतर त्यांनी एक वेगळा आदर्श निर्माण करून पैशांपेक्षा मैत्री टिकवली. हे प्रकरण अमेरिकेतील विस्कॉन्सिन राज्यातील आहे. टॉम कूक आणि जोसेफ फिनी यांनी 1992मध्ये एकमेकांना वचन दिले होते. हे वचन त्यांनी 2020मध्ये म्हणजे तब्बल 28 वर्षांनी पूर्ण केले. टॉम कूक आणि जोसेफ फिनी यांनी एकमेकांना वचन दिले होते की, ज्या कोणाला पॉवरबॉल लॉटरी लागेल, त्यांनी जिंकल्यानंतर पैसे वाटून घ्यायचे. दोघांनी हे वचन 28 वर्षांनी पूर्ण केले. गेल्या महिन्यात मेनोनोमी येथे कूक यांना 22 लाख डॉलर्स म्हणजेच तब्बल 165 कोटींची लॉटरी लागली. ही लॉटरी लागल्यानंतर कूक यांनी सर्वात आधी जोसेफ फिनीला फोन केला आणि दिलेल्या वचनानुसार लॉटरीचे अर्धे पैसे त्यांना दिले. वाचा-बाप-लेकीची जुगलबंदी, चिमुकलीनं कशी दिली वडिलांना टक्कर, VIDEO VIRAL वाचा-VIDEO: सापांशी स्टंटबाजी करणं आलं अंगाशी, वनविभागानं तरुणावर केली अशी कारवाई वाचा-कमी समजायचं नाय, साधूने 3 पेहलवानांना 5 सेकंदात दाखवले आस्मान, VIDEO VIRAL वाचा-याला म्हणता क्वालिटी! टाटाच्या नॅनोला भिडली होंडा सिटी, पण तोंडच चेपले, VIDEO टॉम यांनी फिनीला फोन केल्यानंतर त्यांना या सगळ्यावर विश्वास बसला नाही. फिनीने टॉमला, "तू मस्करी तर कर नाही आहेस ना?", असे विचारे यावर टॉमने, वचन म्हणचे वचन असे सांगितले. टॉम आणि फिनी या दोघांनी सेवानिवृत्ती घेतली आहे. टॉमने निवृत्ती घेतल्यानंतर लॉटरी घेण्यास सुरुवात केली. सध्या दोघंही आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत असून, त्यांच्या या मैत्रीचे कौतुक जगभर केले जात आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या