आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी ट्विटरवर हा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये विमानाच्या विंडो सीटजवळ गुटखा खाल्ल्यानंतर थुंकल्याच्या खुणा स्पष्ट दिसत आहेत. फोटो शेअर करण्यासोबतच अवनीश शरण यांनी मजेशीर कॅप्शन दिलं आहे. त्यांनी लिहिलं, की, 'कोणीतरी आपली ओळख सोडली आहे.' Video Game खेळत टॉयलेट सीटवर बसला, खालून सापाने साधला डाव; गुप्तांगात दात घुसले आणि... विमानाच्या खिडकीवर दिसणारा गुटख्याचा एक मोठा ठिपका सोशल मीडिया वापरकर्त्यांना आश्चर्यचकित करत आहे. नेटकरी यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. वृत्त देईपर्यंत हा फोटो 16 हजारांहून अधिकांनी लाईक केला आहे. तर अनेकांनी यावर निरनिराळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. ज्यामध्ये काहींनी लिहिलं आहे की हे चित्र खूपच वाईट आहे. त्याचवेळी, असं करणाऱ्यांवर मोठा दंड ठोठावण्यात यावा, असंही काही लोकांचं म्हणणं आहे.अपनी पहचान छोड़ दी किसी ने. pic.twitter.com/xsl68VfhH1
— Awanish Sharan (@AwanishSharan) May 25, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Airplane, Photo viral