Home /News /viral /

कायच्या काय! कुत्रा बनण्याची हौस पूर्ण करण्यासाठी खर्च केले 11 लाख, फोटो पाहून व्हाल शॉक

कायच्या काय! कुत्रा बनण्याची हौस पूर्ण करण्यासाठी खर्च केले 11 लाख, फोटो पाहून व्हाल शॉक

एका व्यक्तीने कुत्र्यासारखं दिसण्यासाठी तब्बल 11 लाख रुपये खर्च केले (Man Spends 11 Lakh Rupees To Become A Dog). लहानपणापासूनच त्याला कुत्र्यांसारखं आयुष्य जगण्याची हौस होती.

    नवी दिल्ली 26 मे : जगातील प्रत्येक माणसाचे विचार आणि आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. तर काही लोक मात्र वेगळं काहीतरी करण्यासाठी आपल्या शरीरासोबतही भयंकर प्रयोग करत राहातात. आजपर्यंत तुम्ही अशी अनेक प्रकरणं ऐकली किंवा वाचली असतील ज्यात लोकांनी शस्त्रक्रिया करून आपलं लिंग बदललं किंवा शरीराच्या प्रत्येक भागावर टॅटू काढला. लोक आपली हौस पूर्ण करण्यासाठी अनेकदा अगदी धक्कादायक निर्णयही घेतात. मात्र, सध्या समोर आलेलं एक प्रकरण अतिशय विचित्र आहे. SORRY...SORRY...SORRY... पडणार भारी, लिहिणाऱ्याला शोधतायेत पोलीस; नेमकं काय आहे प्रकरण पाहा असं म्हणतात की हौसेला मोल नाही. हौस पूर्ण करण्यासाठी लोक कितीही पैसे मोजायला आणि अनेकदा तर आपला जीव धोक्यात घालायलाही मागे-पुढे पाहात नाहीत. सध्या समोर आलेल्या घटनेत एका व्यक्तीने आपल्या हौसेपोटी असं पाऊल उचललं ज्याबद्दल जाणून तुम्ही थक्क व्हाल. या व्यक्तीने जे काही केलं, त्याचा विचार कोणी स्वप्नातही करत नसेल. हे अजब प्रकरण जपानमधून समोर आलं आहे. यात एका व्यक्तीने कुत्र्यासारखं दिसण्यासाठी तब्बल 11 लाख रुपये खर्च केले (Man Spends 11 Lakh Rupees To Become A Dog). लहानपणापासूनच त्याला कुत्र्यांसारखं आयुष्य जगण्याची हौस होती. यामुळे लाखो रूपये खर्च करून या व्यक्तीने असा कॉस्ट्यूम बनवून घेतला, जो घातल्यावर तो अगदी कुत्र्यांप्रमाणेच दिसेल. कबुतराची शिकार करण्यासाठी धावलं मांजर...पण...पुढे जे घडलं ते बघून वाटेल आश्चर्य; बघा VIDEO आता या व्यक्तीचे काही फोटोही व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून पहिल्या नजरेत हा कुत्राच आहे, असं तुम्हाला वाचेल. या व्यक्तीचा कॉस्ट्यूम अतिशय रिअल असल्यासारखा वाटतो. मात्र प्रत्यक्षात तो कुत्रा नसून माणूस आहे. हे फोटो पाहिल्यानंतर लोक सोशल मीडियावर यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत. सोबतच सोशल मीडिया यूजर्स या व्यक्तीची खिल्लीही उडवत आहेत.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Dog, Viral news

    पुढील बातम्या