• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • अनोखं टॅलेंट! एका मिनिटात 586 शब्द बोलतो हा व्यक्ती; वेगात बोलून करतो अफाट कमाई

अनोखं टॅलेंट! एका मिनिटात 586 शब्द बोलतो हा व्यक्ती; वेगात बोलून करतो अफाट कमाई

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जॉन एका मिनिटात 586 शब्द बोलतात (Man speaks 586 words in 1 Minute) . म्हणजेच अवघ्या एका सेकंदात ते दहा शब्द बोलतात.

 • Share this:
  नवी दिल्ली 07 नोव्हेंबर : अनेकदा तुम्ही असं ऐकलं असेल की तुमचं म्हणणं एखाद्याला समजवायचं असेल तर त्याला आरामात बोलून सोप्या भाषेत समजवलं पाहिजे. मात्र, जगात अनेक लोक असे असतात जे अत्यंत वेगात बोलतात (Fast Speakers). तर काही लोक असेही आहेत ज्यांचा बोलण्याचा वेग इतका आहे, की त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावी केला आहे (Man Creates World Record by Speaking Fast). आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यक्तीबद्दल सांगणार आहोत. आपल्या बोलण्याच्या स्पीडमुळे हा व्यक्ती जगभरात प्रसिद्ध आहे. अमेरिकेत राहणाऱ्या 67 वर्षीय जॉन मॉशिटा ज्यूनियर (John Moschitta Jr.) यांना लोक वेगात बोलणाऱ्या व्यक्तीच्या रूपात ओळखतात. त्यांचं हे अजब नाव त्यांच्या बोलण्याच्या खास कलेमुळे पडलं आहे. त्यांची बोलण्याची गती पकडणं भल्याभल्यांसाठीही फार अवघड आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जॉन एका मिनिटात 586 शब्द बोलतात (Man speaks 586 words in 1 Minute). म्हणजेच अवघ्या एका सेकंदात ते दहा शब्द बोलतात. कोट्यवधींची उलाढाल! 10 लाखाला 'शाहरूख'ची विक्री, 'सलमान'ची बोली लागली 7 लाखाला आपल्या या टॅलेंटच्या जोरावर त्यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्वतःचं नाव नोंदवलं आहे. मात्र नंतर हा रेकॉर्ड ब्रिटनच्या स्टीव वुडमोर यांनी तोडला. त्यांनी एका मिनिटात 637 शब्द बोलत हा रेकॉर्ड आपल्या नावी केला. जॉन लहान असतानापासूनच आपल्या बहिणींसोबत न्यूयॉर्कमध्ये राहात असे. एकदा त्यांनी वृत्तपत्रात वाचलं की वेगात बोलणाऱ्यांना जाहिरातींमध्ये बोलण्यासाठी पैसे मिळत आहेत. तेव्हापासून जॉनने या प्रोफेशनमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी १०० हून अधिक जाहिरातींमध्ये मायक्रो मशीन मॅनचं काम केलं आहे. यात फेडएक्ससारख्या कंपन्यांच्या जाहिरातींचाही समावेश आहे. साल 1986 मध्ये रिलीज झालेल्या ट्रान्सफॉर्म्स सिनेमात जॉनने ब्लरच्या पात्राला आवाज दिला होता. यानंतर त्यांनी ट्रान्सफॉर्म्सच्या दोन अमेरिकन टीव्ही शोजमध्ये आपला आवाज दिला. शेजारच्या कुत्र्याला Kiss करण्यासाठी खाली वाकली महिला; डॉगने केली भयावह अवस्था नास डेली यूट्यूब चॅनेलसोबत बातचीत करताना जॉनने सांगितलं, की त्यांना शेक्सपियरची नाटकं भरपूर आवडतात. जॉनने आपल्या टॅलेंटच्या जोरावर भरपूर कमाई केली आहे आणि यामुळे तो भरपूर आनंदी आहे. जॉनने सांगितलं की फक्त पैशांची गोष्ट नाही, जेव्हापर्यंत तुम्ही तुमच्या कामात आनंदी आहात तोपर्यंत काम करत राहा. जॉनचं म्हणणं आहे, की लोक तुमच्याबद्दल ठरवू शकत नाहीत, की तुमच्यासाठी काय चांगलं आहे. तुम्हालाच हे ठरवावं लागेल की तुम्ही काय करू शकता.
  Published by:Kiran Pharate
  First published: